Apple Job Cuts : ॲपलच्या सेवा विभागात शेकडो लोकांची गच्छंती?

105
Apple Job Cuts : ॲपलच्या सेवा विभागात शेकडो लोकांची गच्छंती?
Apple Job Cuts : ॲपलच्या सेवा विभागात शेकडो लोकांची गच्छंती?
  • ऋजुता लुकतुके

ॲपल कंपनीने आपल्या वार्षिक समारंभाच्या आधीच नोकर कपातीचा बडगा उगारला आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीतून किमान १०० जणांना काढून टाकण्यात येणार असल्याचं ब्लूमबर्गने म्हटलं आहे. प्रामुख्याने ही कपात ॲपल बुक्स आणि ॲपल बू या ॲपवर काम करणाऱ्या विभागातून होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी विभागातूनही काही जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. ॲपल न्यूज ही सेवा देणाऱ्या विभागातूनही गच्छंती अटळ आहे. (Apple Job Cuts)

(हेही वाचा- Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती)

ॲपल कंपनीने अलीकडेच आपली उत्पादन विकासाची पुढील दिशा स्पष्ट करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष देणार असल्याचं म्हटलं होतं. आयफोन १६ सीरिजमध्येही या फिचरचा जास्तीत जास्त वापर करण्यात आल्याचं समजतंय. अशावेळी प्राधान्य क्रमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष द्यायचं असल्याने इतर विभागांना याचा फटका बसणार आहे. यावर्षीच्या सुरुवातीला कंपनीने व्हिजन हेडसेट तयार करण्याचा प्रकल्प गुंडाळला होता. तसंच आयवॉचचा डिस्प्ले स्वत: तयार करण्याचा प्रकल्पही अर्धवट बंद केला होता. (Apple Job Cuts)

ही सारी गुंतवणूक आता नवीन तंत्रज्जानामध्ये करण्यात येणार आहे हे उघड आहे. त्या दृष्टीनेच नोकर कपातीचा निर्णय कंपनीने घेतला आहे. अर्थात, तशी चर्चा असली तरी कंपनीने त्याला अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही. कंपनीचा वार्षिक कार्यक्रम यंदा ऑगस्ट ऐवजी सप्टेंबरमध्ये होणार आहे. यात आयफोन १६ सह नवीन आयपॅड आणि वॉचही लाँच होणार आहे. अशावेळी नोकर कपातीची बातमीही समोर येत आहे. (Apple Job Cuts)

(हेही वाचा- BMC School CCTV Camera : शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनामागे दडलेय काय?)

ॲपल कंपनीची मुख्य बाजारपेठ अमेरिकेनंतर चीन ही आहे. कोव्हिडनंतर तिथून येणारी मागणी घटली आहे. त्यामुळे ॲपल कंपनीला त्याचा जोरदार फटका बसत आहे. शिवाय चीनमध्ये होणारं ॲपलचं उत्पादनही कमी झालं आहे. (Apple Job Cuts)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.