वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! Vehicles Headlight मध्ये नियमबाह्य बदल करणार्‍यांवर होणार कारवाई

राज्यातील सर्व परिवहन अधिकार्‍यांना आदेश

192
वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! Vehicles Headlight मध्ये नियमबाह्य बदल करणार्‍यांवर होणार कारवाई

वाहनांच्या हेटलाईटची (Vehicles Headlight) प्रकाश किरणे कशी असावीत? याविषयी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’ अंतर्गत मानके निश्चित करण्यात आली आहेत. याला डावलून काही वाहनचालक गाड्यांच्या हेटलाईटमध्ये डोळ्यांना त्रासदायक लाईट बसतात. त्यामधील त्रासदायक प्रकाश किरणांमुळे राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात काही जणांना स्वत:चा प्राणही गमवावा लागला. सुराज्य अभियानाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या परिवहन आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची नोंद घेऊन २३ ऑगस्ट या दिवशी परिवहन आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना दिला आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Haryana Assembly Election : भाजपा पुन्हा खासदारांना विधानसभेसाठी रिंगणात उतरविणार?)

वाहन चालवतांना चालकाचे डोळे समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या (Vehicles Headlight) प्रकाश किरणांमुळे दीपले जाऊ नयेत, यासाठी ‘केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९’च्या अंतर्गत केंद्र शासनाने वर्ष २००५ मध्ये सुरक्षा मानकांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. प्रत्यक्षात यानुसार कार्यवाही होत नसल्याचे सुराज्य अभियानाच्या लक्षात आल्यामुळे परिवहन आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून परिवहन आयुक्तांनी आदेश दिले आहेत. हेडलाईटमध्ये नियमबाह्य पालट करणार्‍या वाहनांची पडताळणी करून दोषी वाहनचालकांवर कारवाई करावी, तसेच याविषयी जनजागृती करावी, असेही परिवहन आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना कळवले आहे, असे मुरुकटे म्हणाले.

(हेही वाचा – Dhoni-Jadeja Viral Pic : धोनी आणि जाडेजाची जोडी शेतात नेमकं काय करत होती?)

प्रत्यक्षात कारवाई व्हावी, अन्यथा न्यायालयात जाऊ!

खरे तर मोटार वाहन कायद्यामध्ये दोषींवर कारवाईची तरतूद असूनही परिवहन विभाग गांभीर्याने कारवाई करत नाही, असे आढळून आल्यामुळे आम्हाला परिवहन आयुक्तांकडे तक्रार करावी लागली आहे. परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकार्‍यांना केवळ आदेश देऊन न थांबता या प्रकरणी खरोखरच कारवाई होत आहे ना? याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यामुळे राज्यातील अनेकांचे प्राण वाचतील. यावर कार्यवाही झाली नाही, तर या प्रकरणी आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही अभिषेक मुरुकटे यांनी दिली आहे. (Vehicles Headlight)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.