जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले Asaram Bapu सात दिवसांच्या पॅरोलवर 

229
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले Asaram Bapu सात दिवसांच्या पॅरोलवर 
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले Asaram Bapu सात दिवसांच्या पॅरोलवर 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexual abuse) केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू सात दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले. तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसाराम बापू बाहेर आले. त्यांना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रुग्णालयात हृदययाच्या संबंधित (Asaram baapu heart related treatment) उपचारासाठी आणण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने आसाराम बापू यांना उपचार घेण्याची परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर त्यांना आयुर्वेदिक रुग्णालयात आणण्यात आले. (Asaram Bapu)

राजस्थान उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी आसाराम बापू यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. पॅरोल मंजूर (Asaram Bapu 7 days parole granted) करताना उच्च न्यायालयाने त्यांना काही अटी घातल्या होत्या. आसारामसोबत प्रवासात चार पोलीस आणि दोन अटेंडंट ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यांना करावा लागणार आहे. (Asaram Bapu)

(हेही वाचा – B Srinivasan NSG चे नवे DG; जाणून घ्या ‘या’ IPS अधिकाऱ्याबद्दल)

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या (८३ वर्षीय) आसाराम यांना मंगळवारी (२७ ऑगस्ट) रात्री ८ वाजता खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या बहुविद्याशाखीय कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. पुढील सात दिवस बापूवर हृदयविकारावर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी रूग्‍णालयात रायगड पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Haryana Assembly Election : भाजपा पुन्हा खासदारांना विधानसभेसाठी रिंगणात उतरविणार?)

गेल्या ११ वर्षांपासून आसाराम बापू लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. आसाराम यांनी याआधी अनेकदा पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र, त्यांना न्यायालयाने पॅरोल मंजूर केला नाही. यावेळी पहिल्यांदाच उपचारांसाठी पॅरोल मागितला गेला आहे. यानंतर न्यायाधीश पुष्प्रेंद भाटी (Judge Pushparend Bhati) आणि न्यायाधीश मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूरच्या एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर हा पॅरोल मंजूर केला आहे. (Asaram Bapu)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.