उद्धव ठाकरेंचे आंदोलन म्हणजे राजकीय गिधाडीवृत्ती; Ashish Shelar यांचे प्रत्युत्तर

101
उद्धव ठाकरेंचे आंदोलन म्हणजे राजकीय गिधाडीवृत्ती; Ashish Shelar यांचे प्रत्युत्तर
  • प्रतिनिधी

एखादी व्यक्ती मरते का आणि आपल्याला खायला मिळते का…याची वाट पाहत गिधाडे बसलेली असतात तशीच राजकीय गिधाडी वृत्ती उद्धव ठाकरेंची असून आपण स्वत: काही करायचे नाही पण एखादी घटना, दुर्घटना घडली की त्यावर राजकीय पोळी भाजण्याचे काम हे करतात, अशा परखड शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बुधवारी (२८ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी उद्धवजी भाषा जपून वापरा कामाठीपूरातील भाषा आम्हालाही येते असा सणसणीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी बुधवारी मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर आ. ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही जी घटना घडली अत्यंत दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायीच आणि मनात संताप निर्माण करणारी घटना असून हा एक अपघात होता याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. तरी आजही पुन्हा माफी मागतो, आणि याप्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व चौकशा होतील आणि कारवाई सुद्धा होईल, यामध्ये सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

(हेही वाचा – वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! Vehicles Headlight मध्ये नियमबाह्य बदल करणार्‍यांवर होणार कारवाई)

उद्धव ठाकरे यांची औरंगजेबी फॅन क्लब वृत्ती

पुन्हा उत्तम दर्जाचे स्मारक उभे ही करण्यात येईल, असे सांगून शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र जे राजकीय पक्ष मालवणमध्ये आंदोलन करण्यासाठी गेले होते तसेच तिथल्या स्थानिक जनतेला आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ही आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. मात्र या पुतळ्याबाबत आज जे आरोप करीत आहेत त्यांनी पुतळा उभा राहिल्यानंतर आणि उभा राहत असताना कधीही काही सूचना केल्या नाहीत. कधी सरकारच्या काही चूका असतील तर लक्षात आणून दिल्या नाहीत. तसेच कधी तो पुतळाही बघायला अथवा अभिवादन करायला ते गेले नाहीत. मात्र दुर्घटना घडताच गिधाडा सारखे आता या विषयावर राजकारण करीत आहेत, असा आरोपही शेलार यांनी केला.

आज उद्धव ठाकरे अशाच राजकीय गिधाडी वृत्तीने वागत असून कधी कुठली दुर्घटना, अथवा अपघात घडतोय याची वाटच पहात बसलेले असतात. उद्धव ठाकरे यांचा हा औरंगजेबी फॅन क्लब आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत आंदोलन करीत आहेत त्यांनीच महाराजांच्या वशंजाकडे पुरावे मागितले होते, यांनीच कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारुन त्यांचा अपमान केला होता. हीच यांची औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता आणि प्रतिकांचा अपमानच वारंवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला गेले पण भगवान विठोबाच्या पायाला हात लावला नाही, तुळशी माळ गळ्यात घालून घेतली नाही. एक मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सोडला तर कधीच ६ डिसेंबरला भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनही करायला चैत्यभूमीवर गेले नाहीत ही यांची औरंगजेबी फॅन क्लब वृत्ती आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अतिक्रमणे झाली तेव्हाही हे कधी बोलले नाहीत, उलट विशालगडावर अतिक्रमणे हटवली तेव्हा यांना वेदना झाल्या, दर्गेमुक्त किल्ले झाले तेव्हाही यांना वेदनाच होत होत्या हीच यांची औरंगजेबी फॅन क्लब वृत्ती आहे, अशीही परखड टीका ॲड. शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

(हेही वाचा – Twitter Outage : मंगळवारी तुमचंही ट्विटर अचानक बंद झालं होतं का?)

आज मालवणमध्ये जावून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भग्न अवस्थेतील पुतळ्याचे फोटो काढून त्यांची जाहीरात करीत आहेत, हेच का तुमचे शिवप्रेम असा सवाल करीत, जो काम करतो तोच चूकतो. आम्हीही काम केले ज्या चूका झाल्या त्या नक्कीच सुधारू, आणि जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करू पण उद्धव ठाकरेंनी घटना घडल्यानंतर राजकीय गिधाडी वृत्तीने वागू नये असा सल्लाही त्यांनी दिला. त्याचवेळी मालवणमध्ये आंदोलन करणाऱ्यांना मोदी-शहांचे दलाल म्हणून संबोधणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्याच भाषेत उत्तर देताना ॲड. शेलार म्हणाले की, भाषा जरा जपूर वापरा, कारण आमच्याकडेही कामाठीपुरातील शब्द आहेत ते जर आम्ही वापरले तर तुम्हाला पळता भूई थोडे होईल. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, स्टॅलीन यांच्या दारात कशाला गेला होतात हे आम्हाला बोलायला लावू नका, असाही सक्त इशारा त्यांनी दिला. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.