Apple Jobs in India : ॲपलकडून भारतात ६ लाख नोकऱ्यांची निर्मिती 

122
Apple Jobs in India : ॲपलकडून भारतात ६ लाख नोकऱ्यांची निर्मिती 
Apple Jobs in India : ॲपलकडून भारतात ६ लाख नोकऱ्यांची निर्मिती 
  • ऋजुता लुकतुके

मोबाईल फोन उत्पादनातील जगातील अग्रगण्य कंपनी आयफोन पुढील वर्षापासून भारतातील आयफोनचं उत्पादन वाढवणार आहे. अशावेळी कंपनीला नवीन तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांचीही गरज पडणार आहे. अशावेळी पुढील वर्षात ॲपल कंपनी भारतात ६ लाख कर्मचाऱ्यांची नोकर भरती करेल, असं बोललं जात आहे. इथं महिलांनाही चांगली संधी असेल. (Apple Jobs in India)

ॲपलने उत्पादनसंदर्भाने काही निर्णय घेतले असून भारतात कंपनीकडून ॲपल मोबाईलचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे, देशात ॲपल कंपनीच्या माध्यमातून लाखो नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे एका अहवालानुसार, ॲपल कंपनीकडून भारतात यावर्षी तब्बल ६ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ॲपलसह कंपनीसोबत भागिदारीत काम करणाऱ्या कंपनीमध्ये ह्या नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. तर, या नोकऱ्यांमध्ये महिलांना मोठी संधी मिळणार आहे. (Apple Jobs in India)

(हेही वाचा- २९ ऑगस्ट रोजी National Sports Day कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?)

थेट ॲपल कंपनीसोबत काम करण्यासाठी संधी २ लाख उमेदवारांना मिळणार आहे. त्यामध्ये, ७० टक्के महिलांना ही संधी मिळणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मार्च महिन्यापासून ह्या नोकरीच्या संधी मिळू शकतात, अशी माहिती आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, ॲपलकडून चीनमधून होणारं उत्पादन कमी करुन ते उत्पादन भारतात सुरू केले जाणार आहे. कारण, ॲपलने आता विक्री व उत्पादनासाठी भारताला नवीन गड म्हणून पाहिले आहे. कंपनीकडून जास्तीत जास्त उत्पादन भारतात केलं जाणार आहे. त्यामुळे, देशातील नागरिकांना व नोकरीसाठी धडपडणाऱ्या युवकांना नोकरीच्या संधी निर्माण होतील. ॲपल आणि ॲपल कंपनीशी संलग्नित कंपन्यांच्या डेटानसंबंधित अंदाजानुसार रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. यावर्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे एकूण 6 लाख रोजगार निर्माण होतील. (Apple Jobs in India)

भारतातील आतापर्यंतच्या नोकऱ्यांचा विचार केला तर फॉक्सकॉन, विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन या ॲपलच्या सहयोगी कंपन्यांनी जवळपास ८०,८७२ नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. विस्ट्रोन आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स बनली आहे. यासह ॲपल कंपनीला पुरवठा करणाऱ्या टाटा ग्रुप, सेलकॉम्प, मदरसन, फॉक्सलिंक, सनवोडा, एटीएल आणि जबील या कंपन्यांनीही ८४ हजार पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. (Apple Jobs in India)

(हेही वाचा- Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)

गत काही वर्षात ॲपलने देशात जास्तीत जास्त ब्लू कॉलर जॉब निर्माण केले आहेत. ब्लू कॉलर जॉब निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲपलचा समावेश असून यामध्ये युवकांसह महिलांचीही मोठी संख्या आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सन २०२० मध्ये आय स्मार्टफोन प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव स्कीम  नंतर ॲपलचे वेंडर जवळपास १,६५,००० नोकऱ्या निर्माण करु शकले आहेत. सरकारचं असं म्हणणं आहे की, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये १ थेट नोकरीमुळे आणखी ३ लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळत असतो.. म्हणजे, एका नोकरीमुळे आणखी ३ नोकऱ्या अप्रत्यक्षपणे निर्माण होत असल्याचं सांगण्यात येतं. (Apple Jobs in India)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.