‘भिडला की रडला’? नेटकऱ्यांनी Aaditya Thackeray ना का केला प्रश्न?

380
Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर बुधवारी २८ ऑगस्टला शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि भाजपाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि दगडफेक झाली. त्यानंतर रात्री आदित्य ठाकरे सुखरूप घरी पोहोचल्यानंतर उबाठाच्या ‘X’ हॅंडलवर ‘वाघ भिडला’ असा मथळा देत त्यांचा एक फोटो शेयर करण्यात आला. मात्र, नेटकऱ्यांनी आदित्य यांना प्रचंड ट्रोल करत त्यांचा पार कचरा केला.

(हेही वाचा- ICC Test Ranking : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय क्रिकेटपटूंची चलती, विराटची आगेकूच)

‘उंदीर भिडला’

‘भिडला नाही रडला’, ‘अजून एक जोक सांग, कसा भिडला’ असे विचारात एका नेटकाऱ्याने लहान बाळाचा फोटो टाकला, एकाने तर ‘कडेकडेने निघाला, उभ्या महाराष्ट्राने पाहिला’ अशी प्रतिक्रिया दिली. एकाने तर आदित्य ठाकरे यांच्या फोटोवर उंदराचा चेहेरा लावत ‘उंदीर भिडला’ असा मथळा दिला. दोन नेटकऱ्यांनी पट्टेरी कुत्र्याचा फोटो शेयर करत ‘व्हाग कडेकडेने निघाला’ असे म्हणत वेगळाच संदेश दिला.  (Aaditya Thackeray)

Add a heading 8

WhatsApp Image 2024 08 29 at 2.01.17 PM

राजकारण नको

काहींनी शिवरायांच्या पुतळ्याचे राजकारण करू नका, असा सल्ला देत जाहीर निषेध व्यक्त कला. एकाने ‘अगोदर बोलला पाहणीसाठी जात आहे. आता बोलतो भिडलो. शेंबड्या, भिडायसाठी आला असता ना, बाज वर बसून घरी गेला असता’ असे म्हटले तर एकाने ‘पेंग्विन भिडत नसतो, पळून जात असतो’ असा टोला हाणला. (Aaditya Thackeray)

(हेही वाचा- Deep Fake Video of Virat Kohli : विराट, शुभमनचा डीपफेक व्हीडिओ व्हायरल )

मालवणला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि विरोधी पक्षाने त्यावरून राजकारण सुरू केले. याबाबत जनतेत प्रचंड रोष असून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Aaditya Thackeray)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.