ATS Raid Pune : पुण्यात एटीएसचा छापा; बनावट टेलिफोन एक्स्चेंजमधून ३ हजार ७८८ सीम कार्ड जप्त

ATS Raid Pune : कोंढव्यातील मीठानगरमधील एम ए कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकल्यावर घटनास्थळावरून विविध कंपन्याचे ७ सीम बॉक्स, ३ हजार ७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, मोबाइल, अँटिना आणि लॅपटॉप आढळून आले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

136
ATS Raid Pune : पुण्यात एटीएसचा छापा; बनावट टेलिफोन एक्स्चेंजमधून ३ हजार ७८८ सीम कार्ड जप्त
ATS Raid Pune : पुण्यात एटीएसचा छापा; बनावट टेलिफोन एक्स्चेंजमधून ३ हजार ७८८ सीम कार्ड जप्त

पुणे शहरातील कोंढवा भागात बेकायदा पद्धतीने चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश करण्यात एटीएस विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. (ATS Raid Pune)

(हेही वाचा – Jay Shah : आयसीसी अध्यक्ष म्हणून जय शाह यांच्यासमोरील ५ आव्हानं )

७ सीम बॉक्स, ३ हजार ७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, मोबाइल जप्त

पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa) भागात बेकायदा पद्धतीने चालवल्या जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजचा (Fake telephone exchange) एटीएस विभागाने पर्दाफाश केला आहे. कोंढव्यामध्ये बेकायदा चालवले जात असलेल्या बनावट टेलिफोन एक्स्चेंजवर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. कोंढव्यातील मीठानगरमधील एम ए कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकल्यावर घटनास्थळावरून विविध कंपन्याचे ७ सीम बॉक्स, ३ हजार ७८८ सीम कार्ड, ९ वायफाय राऊटर, मोबाइल, अँटिना आणि लॅपटॉप आढळून आले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नौशाद अहमद सिद्धीकी पोलिसांच्या ताब्यात 

या प्रकरणी ३२ वर्षीय नौशाद अहमद सिद्धीकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नौशाद अहमद सिद्धीकी यास ताब्यात घेण्यात आले असून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील मीठानगरमधील एम ए कॉम्प्लेक्समध्ये ३२ वर्षीय नौशाद अहमद सिद्धीकी हा तरुण बनावट टेलिफोन एक्स्चेंज सिम बॉक्सच्या साह्याने अनधिकृतपणे बनावट टेलिफोन एक्स्चेंजचे चालवित आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर या आरोपीकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे समजते. (ATS Raid Pune)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.