Jharkhand Assembly Election : चंपाई सोरेन भाजपाला मिळालेली सुवर्णसंधी

134
Jharkhand Assembly Election : चंपाई सोरेन भाजपाला मिळालेली सुवर्णसंधी

राज्य विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरु झालेले राजकीय नाट्य भाजपासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण चंपाई सोरेन यांच्या माध्यमातूनच झारखंडमधील आदिवासी वोट बॅंक साधणे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी सोपे होते. मात्र आता त्यांच्यासाठी हे काम जरा जिकरीचे होणार आहे. यामुळे चंपाई सोरेन भाजपाला मिळालेली सुवर्णसंधी असल्याचे बोलले जात आहे. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – NDA ला एकत्र ठेवणे भाजपासाठी तारेवरची कसरत)

आता प्रश्न असा आहे की चंपाई सोरेन बऱ्याच काळापासून बंडाच्या स्वरात बोलत होते. मात्र असे असूनही झारखंड मुक्ती मोर्चा च्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही आणि त्यांना अजुनही मंत्रिमंडलात का ठेवले आहे? त्याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर अशा दृ‌ष्टीकोनातून पाहावे लागेल की चंपई सोरेन कोल्हान प्रदेशातील मोठे नेते आहेत. या भागातील १४ विधानसभा जागांवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांना नाराज करणे ही झारखंड मुक्ती मोर्चाला परवडणारे नाही. (Jharkhand Assembly Election)

भाजपाकडे दोन मोठे आदिवासी चेहरे

भाजपाकडे या राज्यात अर्जुन मुंडा आणि बाबूलाल मरांडी दोन मोठे आदिवासी चेहरे आहेत. तरीही, कोल्हान भागात चंपाई सोरेन यांच्या प्रभावापुढे हे दोन नेते टिकाव धरत नाहीत. कोल्हान भागाची खासियत अशी की, आपल्याच भूमीतून नायक निर्माण करणे आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभ राहणे हे येथील वैशिष्ट्य राहिले आहे. चंपाई सोरेन हे त्यांचे नायक आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन उर्फ गुरुजी यांनाही कोल्हान भागात विरोधाचा सामना करावा लागला होता यावरून या भागातील जनतेची ताकद लक्षात येते. (Jharkhand Assembly Election)

(हेही वाचा – Passport Portal Shut: पासपोर्ट काढताय तर थांबा! आजपासून 5 दिवस देशभरात पोर्टल राहणार बंद)

चंपाई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाला मोठ्या अपेक्षा आहेत. कोलहान भागात भाजपाची एकही जागा नाही. यामुळे आपला या भागात दबदबा निर्माण होईल असे भाजपाला वाटतं. येथील युवकांना स्टील आणि अन्य कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी चंपाई सोरेन यांचा मोठा हात आहे. त्यामुळे या भागातील जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. (Jharkhand Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.