विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विविध मतदारसंघात दिग्गज तयारीला लागले. यंदा विधानसभेचे उमेदवारी आपल्यालाच मिळावी यापेक्षा उमेदवार या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना लवकरच पहावयास मिळणार आहेत. त्यातच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील मागच्या वर्षी फूट पडली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाजूला घेऊन सत्तेत सामील झाले. त्यामुळेच अजित पवार यांच्या समवेत गेलेल्या आमदारांच्या कुटुंबातीलच उमेदवार शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उभे केले जाणार आहेत. त्यामुळेच यंदा विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार किती घरे सोडणार हा प्रश्न उभा राहिला आहे.
बुलढाणा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पवार गटाकडून त्यांची पुतणी गायत्री शिंगणे निवडणुकीसाठी तयारी करत आहे. तर दुसरीकडे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हिला शरद पवार (Sharad Pawar) गटातून निवडणूक उमेदवारी देणार असल्याने धर्मरावबाबांच्या विरोधात त्यांची कन्याच निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी बोलून दाखवले आहे.
(हेही वाचा Indian Railway च्या रुळांना लक्ष्य करा; पाकिस्तानातील दहशतवादी फरहातुल्ला घोरीची चिथावणी )
दरम्यान जागा वाटपावरून तिढा असलेल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु आहे.शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. वेळ पडल्यास ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवून विधानसभा निवडणूक लढवू शकतात. सहा वेळचे माढा विधानसभेचे आमदार बबन दादा शिंदे हे देखील अजितदादांची साथ सोडत शरद पवार गटाकडनं विधानसभा निवडणूक लढवू शकतात. अशा एक ना अनेक प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यावर असताना विविध राजकीय घराण्यांमध्ये भेटीगाठी घेऊन घराघरांमध्येच संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण करण्याचे काम सुरू आहे.
Join Our WhatsApp Community