PM Narendra Modi यांच्या हस्ते शुक्रवारी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन

ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधन

120
PM Narendra Modi यांच्या हस्ते शुक्रवारी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे ११ वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघर मधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पालघरमध्ये पंतप्रधान

३० ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान (PM Narendra Modi) वाढवण बंदराचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ७६,००० कोटी रुपये आहे. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे उद्दिष्ट असून डीप ड्राफ्ट मुळे मोठ्या कंटेनर जहाजांना तसेच अति-मोठ्या मालवाहू जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येईल, त्यामुळे देशाच्या व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

(हेही वाचा – CC Road : चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्ताच चार महिन्यांत गेला वाहून, हेच का सिमेंट काँक्रिटचे दर्जेदार काम?)

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या संधीत लक्षणीय वाढ होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मदत होईल अशी अपेक्षा आहे. वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर, भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.

पंतप्रधान सुमारे १,५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील ज्याचा उद्देश देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवणे हा आहे. या उपक्रमांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – येत्या विधानसभेला Sharad Pawar डझनभर घरांमध्ये तरी फूट पाडतील?)

या दौऱ्यात पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते सुमारे ३६० कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजेच जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत देशातील १३ किनारपट्टीवरील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यात कार्यरत यांत्रिकी तसेच मोटरबसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्याने १ लाख ट्रान्सपाँडर बसवण्यात येणार आहेत. व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीम ही इस्रोद्वारे विकसित स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली असून मच्छिमारांना समुद्रात असताना दोन्ही बाजूंनी परस्परांशी संपर्क स्थापित करण्यात मदत करेल तसेच बचाव कार्यात मदत करून आपल्या मच्छिमारांची सुरक्षितता देखील सुनिश्चित करेल.

याप्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्क्सचे विकसन तसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा स्वीकार यांचा समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून माशांचे उत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच मत्स्य क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे या कार्यांसाठी निर्णायक ठरणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवतील.

पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) हस्ते यावेळी मासेमारी बंदरे, मासे ठेवण्याची केंद्रे यांचा विकास, अद्यायावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच मासळी बाजारांचे बांधकाम यांसह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात येईल.

(हेही वाचा – Congress च्या बंडखोरीचा ‘Sangli Pattern’ विधानसभा निवडणुकीतही)

पंतप्रधानांची मुंबई भेट

मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) २०२४ च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे. देशभरातील तसेच जगातील अनेक देशांतून आलेले विविध धोरणकर्ते, नियामक, जेष्ठ बँकिंग तज्ञ, उद्योग क्षेत्रातील अगणी तसेच शिक्षण तज्ञ असे सुमारे ८०० वक्ते या परिषदेतील ३५० हून अधिक सत्रांना संबोधित करतील. या चर्चेद्वारे फिनटेकविषयक परिदृष्यातील आधुनिक नवोन्मेषांचे देखील दर्शन घडेल. जीएफएफ २०२४ मध्ये उद्योगविषयक सखोल जाण आणि सखोल माहिती देणाऱ्या विचारवंतांचे २० हून अधिक अहवाल आणि श्वेतपत्रिका सादर होणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.