MHADA च्या ‘त्या’ मंडळातील अभियंत्यांवर होणार कारवाई?

656
MHADA Lottery 2024 : १.१३ लाख अर्जदारांनी भरली अनामत रक्कम
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी गलिच्छ वस्ती सुधार मंडळाच्यावतीने विलेपार्ले येथील पायवाटांच्या सुधारणासाठी निविदा निमंत्रित करण्यात आली आहे. म्हाडाच्या (MHADA) या मंडळाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निविदेतील कामांच्याखाली विभागप्रमुख असे स्पष्ट नमुद केल्याने याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र, निविदेतील विभागप्रमुख नाव निव्वळ प्रिटींग मिस्टेक असली तरी यामुळे सरकारच अडचणी आल्याने या विभागाचे कनिष्ठ अभियंतासह कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – CC Road : चिकूवाडीतील जॉगर्स पार्क रस्ताच चार महिन्यांत गेला वाहून, हेच का सिमेंट काँक्रिटचे दर्जेदार काम?)

म्हाडा (MHADA) झोपडपट्टी गलिच्छ वस्ती सुधार मंडळाच्यावतीने बुधवारी म्हाडाच्या संकेतस्थळावर विलेपार्ले येथील पायवाटा आदी विकासकामांसाठी निविदा प्रसिद्ध केली. म्हाडाच्या या वेबसाइटवर या ई-निविदा सूचनेत विभागप्रमुख यांच्या नावाने निधीचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसच्या माजी महिला मुंबई अध्यक्षा आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदवत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आजवर आम्ही खासदार निधी, आमदार निधी, नगरसेवक निधी याबाबत ऐकले होते, पण आता राज्य सरकारने विभागप्रमुख हे नवीन पद सुरु केले आहे का असा सवाल करत त्यांनी तुमच्या सरकारकडे भ्रष्टाचार करण्याचा खरोखरच अनोखा मार्ग आहे का अशी विचारणा केली आहे.

(हेही वाचा – येत्या विधानसभेला Sharad Pawar डझनभर घरांमध्ये तरी फूट पाडतील?)

मात्र, याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता नगरविकास खात्याच्या विशेष निधीतून ही कामे करण्यात येत असून हा विशेष निधी नगरविकास खात्याकडून जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाला आहे. आजवर विभागप्रमुख हा आमदारांकडे मागणी करत होते, तशीच जर विभागप्रमुखाने मागणी केली असेल तर त्याचा उल्लेख या अभियंत्यांकडून थेट झालेला आहे. मात्र विभागप्रमुखाच्या नावाचा उल्लेख करण्याची कोणतीही तरतूद किंवा प्रावधान नाही किंवा नियमांतही नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अभियंत्याकडून अनावधाने प्रसिद्ध केले असल्याने याप्रकरणी संबंधित अभियंत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. (MHADA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.