Agriculture Ministry : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय १ एकर परिसरात ‘मातृ वन’ उभारणार

118
Agriculture Ministry : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय १ एकर परिसरात 'मातृ वन' उभारणार

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी #एक_पेड़_ माँ_के_नाम, #Plant4Mother या अभियाअंतर्गत पुसा इथल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. आपले मंत्रालय (Agriculture Ministry) सुमारे १ एकर इतक्या परिसरात ‘मातृ वन’ उभारणार असल्याची घोषणा शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी केली. यावेळी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्रालयाचे सुमारे २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला धरूनच समांतरपणे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र आणि राज्यस्तरीय कृषी विद्यापीठांच्या अखत्यारीतील देशभरातील सर्व कार्यालयांच्या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजित केले गेले होते. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी संबंधित ८०० पेक्षा जास्त संस्था संघटना सहभागी झाल्या होत्या, आणि त्यांनी सुमारे ३००० ते ४००० रोपे लावली जातील अशी माहिती शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या हस्ते शुक्रवारी वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन)

यावेळी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थितांना संबोधित केले. अलिकडेच ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी #एक_पेड़_मां_के_नाम, #Plant4Mother या जागतिक अभियानाचा प्रारंभ केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतले हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपल्या मंत्रालयाने एक मोठी लोक चळवळ उभारण्याच्या उद्देशाने आजपासून #एक_पेड़_मां_के_नाम, #Plant4Mother ही मोहीम सुरू केली आहे असे शिवराजसिंह चौहान यावेळी म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे आणि वृक्षारोपण करून आपल्या मातेला तसेच पृथ्वीमातेला आदरांजली वाहावी, असे आवाहनही शिवराजसिंह चौहान यांनी केले. जागतिक अभियानाचा एक भाग म्हणून, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावली जाणार आहेत. जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरणाची प्रक्रिया रोखत, ती पालटण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत सक्षम उपाययोजना ठरणार आहे. (Agriculture Ministry)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.