- प्रतिनिधी
वडाळ्यात १२ वर्षाच्या मुलाची हत्या करून फरार झालेला सराईत गुन्हेगार बिपुल शिकारीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ९ राज्ये पायाखाली घातल्यानंतर शिकारी हा दिल्लीच्या कमला मार्केटच्या एका कुंटणखाण्यात आढळून आला. मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांची मदत घेऊन शिकारीला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. बिपुल शिकारी हा पश्चिम बंगालमधील कुख्यात खोगीर मांजी टोळीचा गँगस्टर होता, मांजी हा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेल्यावर ही टोळी फुटली आणि बिपुल शिकारी हा वेश्या दलालीचे काम करू लागला होता. (Crime)
दरम्यान, त्याने एका वेश्यासोबत लग्न केले आणि तिच्या हत्येत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या बर्धवान कारागृहात शिक्षा भोगणारा शिकारीला कोरोना काळात संचित रजेवर सोडण्यात आले होते, त्यानंतर तो तुरुंगात पुन्हा गेलाच नाही, पश्चिम बंगाल पोलीस त्याचा शोध घेत असल्यामुळे शिकारी हा २०२२ मध्ये मुंबईत पळून आला. एका बंगाली नागरिकासोबत तो वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत राहत होता. मुंबईत तो वॉचमनची नोकरी करू लागला, त्याने शेजारीच राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढून त्याला हुक्का ओढण्याची सवय लावली व त्याचा गैरफायदा घेऊ लागला होता. २८ जानेवारी रोजी तो १२ वर्षाच्या बळीत मुलाला घेऊन तृतीयपंथीयांचे जीवन कसे असते ते दाखविण्यासाठी घेऊन गेला होता. तेथून तो बळीत मुलाला घेऊन पूर्व मुक्त मार्ग वडाळा येथे खाडीजवळ निर्जन ठिकाणी घेऊन आला, त्या ठिकाणी त्याने मुलाचा गैरफायदा घेतला, मुलाने त्याला या कृत्याबाबत घरी सांगतो अशी धमकी दिल्यामुळे शिकारा याने १२ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह खाडित फेकला होता. (Crime)
(हेही वाचा – Madarsa मध्ये रोज छापल्या जायच्या २० हजार रुपयांच्या बनावट Note)
बळीत मुलगा सकाळपासून बेपत्ता असल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला, त्यावेळी बळीत मुलाला शिकारीसोबत काही जणांनी शेवटचे बघितले होते. त्याच दरम्यान शिकारा हा एकटाच घरी आल्यामुळे त्याच्यावर संशय आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याच्याकडे मुलाची चौकशी केली, परंतु तो काहीच सांगत नसल्यामुळे अखेर नागरिकांनी त्याला चोप देत वडाळा टीटी पोलीस ठाण्यात घेऊन आले. शिकाराने पोलीस ठाण्यातून पळ काढला होता. बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध सुरू असताना ३ मार्च रोजी बळीत मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत धड मुंडके वेगवेगळे मिळून आले होते. तपासात मृतदेह बेपत्ता असलेल्या मुलाचा असल्याचे उघडकीस येताच वडाळा टीटी पोलिसांनी अपहरण, हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Crime)
बिपुल शिकारीने हत्या केल्याचे निष्पन्न होताच, मुंबई गुन्हे शाखा आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे विविध पथकाने शिकाराचा शोध सुरू केला. शोध पथकाने जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हरियाणा, पंजाब आणि तमिळनाडू हे ९ राज्य पालथी घातल्यानंतर सिकारा पूर्वी वेश्यादलाल असल्यामुळे तो कुंटणखाना येथे येऊ शकतो ही शक्यता असल्यामुळे मागील दीड महिन्यात वडाळा टीटी पोलिसांचे पथक दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातील कुंटणखाना येथे लक्ष ठेवून होते, वडाळा पोलिसांच्या पथकाने या कुंटणखाना येथे आपले खबरी तयार करून शिकारा आल्यावर आम्हाला कळवा अशी सांगून पोलीस पथक मुंबईकडे रवाना झाले होते. (Crime)
(हेही वाचा – Nagarpath Vendor Committee Election : मतदान ४९.४६ टक्के, पण निकाल राखीव)
गेल्या आठवड्यात गुरुवारी हा दिल्लीच्या कमला मार्केट येथील कुंटणखाना येथे आला असल्याची खबर वडाळा पोलिस ठाण्याचे शोध पथकाला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांकडून मदत मागवून आरोपी बिपुल शिकाराला ताब्यात घेण्यासाठी विनंती केली. दिल्ली पोलिसांनी बिपुल शिकाराला ताब्यात घेतले, त्यावेळी शिकारा हा नशेत होता. दरम्यान वडाळा टीटी पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले व शुक्रवारी त्याला ताब्यात घेऊन अटक करून ट्रँझिस्ट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. मुंबईत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी पत्रकारांना दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपुल सिकारा हा सिरीयल किलर असल्याची शक्यता असून त्याने पश्चिम बंगालमध्ये चार ते पाच हत्या केल्याची कबुली आरोपी देत आहे, परंतु याबाबत पोलिसांच्या हाती कुठलाही पुरावा नसल्यामुळे आरोपी सत्य सांगत आहे की खोटं सांगत आहे याची खात्री करण्यात येत आहे. तसेच मागील दीड वर्षांपासून मुंबईत राहणारा शिकाराने मुंबईत देखील गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नसून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community