- प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणीवपूर्वक योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खूपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवारने लाडकी बहीण योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी गुरुवारी (२९ ऑगस्ट) प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. या याचिकेमुळे काँग्रेसने आपला महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा दाखवून दिल्याची टीकाही त्यांनी केली.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण नको! CM Eknath Shinde यांचे आवाहन)
वडपल्लीवार यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेचे महिलावर्गातून स्वागत होत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने झुकेल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस या ना त्या प्रकारे योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
(हेही वाचा – Crime : आरोपी शिकाराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ९ राज्ये पालथी घातली; अखेर सापडला दिल्लीच्या कुंटणखान्यात)
राज्यातील माताभगिनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही हे वारंवार महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात येत असूनही काँग्रेसकडून अपप्रचार केला जात आहे. विरोधाला विरोध करायचा या भूमिकेनुसार महिला हिताच्या या योजनेला आडकाठी करण्यात येत असून काँग्रेस आणि विरोधकांच्या भुलथापांना सूज्ञ जनता बळी पडणार नाही, असा विश्वासही उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community