अखेर Mumbai-Goa Highway च्या ‘त्या’ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; एकाला अटक

109
अखेर Mumbai-Goa Highway च्या ‘त्या’ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; एकाला अटक
अखेर Mumbai-Goa Highway च्या ‘त्या’ ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; एकाला अटक

मागील १७ वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या आदेशानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai-Goa Highway)

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) इंदापूर ते वडपाले (Indapur to Vadapale) या २६.७ किमी अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड (Chetak Enterprises Limited) आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी (APPCO INFRASTRUCTURE LIMITED COMPANY) या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Respiratory Diseases : श्वसन विकाराच्या तक्रारीत प्रामुख्याने वाढ)

माणगाव पोलिसांत गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे (Engineer Sujit Kawle) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कावळे यांना अटकही करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी महामार्गावरील अपघातांस जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai-Goa Highway)

चार वर्षांत १७० अपघात आणि ९७ बळी

महामार्गाच्या कामातील हलगर्जीमुळे २०२० पासून आतार्यंत १७० मोटार अपघातांत ९७ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या स्वरुपाच्या गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – Respiratory Diseases : श्वसन विकाराच्या तक्रारीत प्रामुख्याने वाढ)

२०१७ पासून काम सुरूच…

रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ कि. मी. अंतरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या निविदांद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड (Chetak Enterprises Limited) आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (APPCO INFRASTRUCTURE LIMITED COMPANY) या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून काम सुरू केले.

या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढून दिली होती. अजूनही हे काम अपूर्णावस्थेतच आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.