कोरोनात योग आशेचा किरण ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास 

देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे, योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा, हीच अपेक्षा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

114

सध्याच्या परिस्थितीत सर्व जग कोरोना महामारीशी लढत आहे, अशावेळी योग लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

कोरोनच्या दीड वर्षांच्या काळात योग वाढला!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचे महत्व सांगितले. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते, असेही यावेळी त्यांनी सांगितले. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचे पंतप्रधानांनी संगितले. योगाने संयमाची शिकवण दिली, कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते, पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढगेले, देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे, योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देश, समाज निरोगी राहावा, हीच अपेक्षा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा : उध्दव ठाकरे सुधीर भाऊंना विसरले!)

डॉक्टरांकडूनही योगाचा वापर! 

कोरोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश त्यासाठी सक्षम नव्हता. अशा कठीण परिस्थितीत योग हाच आत्मशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा मार्ग ठरला. आपण आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला, असे त्यांनी सांगितले. आजारातून बाहेर पडल्यानंतरही योग महत्वाचा आहे, योगामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यास मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असले तरी आपल्याकडे तोडगा असल्याचे योगा सांगत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.