Ramakant Achrekar Statue : मुंबई क्रिकेटच्या पंढरीत, शिवाजी पार्कवर उभारणार रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा 

Ramakant Achrekar Statue : सचिन तेंडुलकरने मानले राज्यसरकारचे आभार 

137
Ramakant Achrekar Statue : मुंबई क्रिकेटच्या पंढरीत, शिवाजी पार्कवर उभारणार रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा 
Ramakant Achrekar Statue : मुंबई क्रिकेटच्या पंढरीत, शिवाजी पार्कवर उभारणार रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा 
  • ऋजुता लुकतुके

मुंबईत दादरचं शिवाजी पार्क मैदान हे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. इथंच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) रमाकांत आचरेकर सरांच्या हाताखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तिथेच आता आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ्य त्याचं शिल्प उभारलं जाणार आहे. त्यांच्या स्मृतीदिनी ही भेट राज्यसरकारने सचिन तेंडुलकर आणि त्याच्यासह सरांच्या इतर अनेक शिष्यांना दिली आहे. (Ramakant Achrekar Statue)

शिवाजी पार्क परिसरातील गेट क्र. ५ जवळ हे स्मृतिशिल्प उभारलं जाणार आहे. या गेटजवळील मोकळ्या जागेत ६x६ंx६ फुटांची जागा या शिल्पासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. आवश्यक परवानग्या, वेळेत स्मृतीशिल्प उभारले जाईल यासंदर्भात मुंबई पालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृतिशिल्प उभारणीनंतर देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि लागणारा निधीची तरतुदीची जबाबदारी बी.व्ही. कामथ मेमोरीअल क्रिकेट क्लबची राहणार आहे. (Ramakant Achrekar Statue)

(हेही वाचा- Assam Assembly: मुस्लिमांना आता विवाह तसेच तलाकबाबत नोंदणी बंधनकारक; आसाममध्ये विधेयक मंजूर)

आचरेकर सरांचा माझ्या जीवनावर आणि इतर अनेक जीवनावर मोठा प्रभाव पडला आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले. शिवाजी पार्कवर कायम राहणे हीच आचरेकर सरांची इच्छा असेल. आचरेकर सरांचा त्यांच्या कर्मभूमीवर पुतळा उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला, अशा भावना सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) व्यक्त केल्या. (Ramakant Achrekar Statue)

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडविण्यात आचरेकर सरांचे मोठे योगदान आहे. जागतिक कीर्तीचे अनेक खेळाडू त्यांनी घडविले. मुंबईला क्रिकेटची पंढरी समजली जाते. तर शिवाजी पार्क हे खेळाडूंसाठी चंद्रभागाप्रमाणे आहे. या मैदानात आचरेकर सरांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले. क्रिकेट म्हटले की आचरेकर सरांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांची स्मृती चिरंतन राहण्यासाठी शिवाजी पार्कवर त्यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. सचिन बरोबरच विनोद कांबळी (Vinod Kambli), अतुल रानडे (Atul Ranade), प्रवीण आमरे (Pravin Amre), जतीन परांजपे (Jatin Paranjape), चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit), सुलक्षण कुलकर्णी (Sulakshan Kulkarni) असे अनेक खेळाडू आचरेकर सरांनी घडवले. (Ramakant Achrekar Statue)

(हेही वाचा- पंतप्रधान Narendra Modi महाराष्ट्रात; ७६००० कोटींच्या वाढवण बंदराचे करणार भूमिपूजन)

सचिनच्या जडणघडणीत आचरेकर सरांचं योगदान महत्त्वाचं आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दित अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये सचिनचा उल्लेख केला जातो. क्रिकेटमधील या योगदानाबद्दल भारत सरकारने सचिनला देशातील ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. (Ramakant Achrekar Statue)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.