IPL Mega Auction : आयपीएल लिलावात लखनौ संघ रोहित शर्मासाठी उत्सुक, लावणार ५० कोटींची बोली?

103
IPL Mega Auction : आयपीएल लिलावात लखनौ संघ रोहित शर्मासाठी उत्सुक, लावणार ५० कोटींची बोली?
IPL Mega Auction : आयपीएल लिलावात लखनौ संघ रोहित शर्मासाठी उत्सुक, लावणार ५० कोटींची बोली?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमध्ये आता वेध लागले आहेत ते आयपीएलच्या पुढील हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या मेगा लिलावाचे. या लिलावामुळे सर्वच संघात मोठे बदल होणार आहेत. तर लिलावाच्या आधीही संघांमध्ये खेळाडूंची व्यावसायिक देवाण धेवाण होऊ शकते. (IPL Mega Auction)

अशावेळी सगळ्यांचं लक्ष आहे ते भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma). तो मुंबई इंडियन्स संघात नाराज आहे. मुंबई फ्रँचाईजीही त्याला ताफ्यात ठेवण्यासाठी उत्सुक नाही, असं दिसत आहे. तसं झाल्यास, लिलावात रोहित शर्माला आपल्याकडे ओढण्यासाठी नक्कीच चढाओढ पाहायला मिळेल. लखनौ सुपर जायंट्स संघ त्याच्यासाठी ५० कोटी रुपयांची बोली लावेल, असंही बोललं जात आहे. याचदरम्यान लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका (sanjiv goenka) यांनी मोठं विधान केलं आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- पंतप्रधान Narendra Modi महाराष्ट्रात; ७६००० कोटींच्या वाढवण बंदराचे करणार भूमिपूजन)

रोहित शर्मासारख्या (Rohit Sharma) खेळाडूमुळे कोणत्याही संघाला फायदा होईल, पण त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य होणार नाही, असे मत संजीव गोयंका यांनी व्यक्त केले. एका मुलाखतीदरम्यान संजीव गोएंका (sanjiv goenka) म्हणाले, कोणालाही माहिती नाही की रोहित शर्मा लिलावात भाग घेत आहे की नाही? मुंबई इंडियन्स रोहितला सोडणार का यावर अवलंबून आहे. तरीही, जर रोहित लिलावात सहभागी झाला आणि जर तुम्ही त्याच्यावर पर्समधील ५० टक्के खर्च केला तर तुम्ही इतर खेळाडूंना कसे खरेदी करू शकाल. प्रत्येकाला चांगला खेळाडू आणि कर्णधार हवा असतो. तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्यासोबत काय करू शकता यावर ते अवलंबून आहे, असं संजीव गोयंका म्हणाले. (IPL Mega Auction)

इंडियन प्रीमियर लीग २०२५ पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे. लखनौने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. झहीर खानने भारतासाठी १७ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये १७ बळी मिळवले आहेत. झहीर खानने (Zaheer Khan) २०० एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये २८२ विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खानने टीम इंडियासाठी एकूण ३११ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. (IPL Mega Auction)

(हेही वाचा- Ramakant Achrekar Statue : मुंबई क्रिकेटच्या पंढरीत, शिवाजी पार्कवर उभारणार रमाकांत आचरेकर सरांचा पुतळा )

आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. गेल्या हंगामातही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.