Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?

Jay Shah : आणखी एका भाजपा नेत्याच्या मुलाचं नाव सचिव म्हणून घेतलं जात आहे

142
Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?
Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्याजागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार याची चर्चाही सगळीकडे सुरू झाली. सगळ्यात आधी नाव घेतलं जात होतं ते आयपीएलचे अध्यक्ष आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अरुण धुमाळ (arun dhumal) यांचं या नावाची चर्चा असतानाच आता आणखी एका भाजपा नेत्याच्या मुलाचं नाव समोर आलं आहे. आणि हे नावच आघाडीवर असल्याचं दिसतंय.

(हेही वाचा- BMC Retired Employees : रजेचे पैसे रोखून पेन्शन, पीएफ, ग्रॅज्युएटीची रक्कम दुसऱ्याच महिन्यात जमा होणार खात्यात)

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहन जेटली (Rohan Jaitley) हेच बीसीसीआयचे नवीन सचिव होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. रोहन जेटली यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्यासह इतर अधिकारी त्यांच्या पदावर कायम राहतील. रोहन जेटली हे २०२० मध्ये प्रथमच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाले. यानंतर ते २०२१ मध्ये पुन्हा निवडून आले आहेत.  (Jay Shah)

रोहन जेटली (Rohan Jaitley) हे भारतीय जनता पक्षाचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे पुत्र आहेत. रोहन जेटली हे दोन वेळा डीडीसीएचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना क्रीडा प्रशासक म्हणून चांगला अनुभव आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहनच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लीगमध्ये ऋषभ पंत आणि इशांत शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. (Jay Shah)

(हेही वाचा- IPL Mega Auction : आयपीएल लिलावात लखनौ संघ रोहित शर्मासाठी उत्सुक, लावणार ५० कोटींची बोली?)

आणखी एक नाव सचिव पदासाठी चर्चेत आहे ते अरुण धुमाळ यांचं. ते हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसंच आयपीएलचे प्रमुख आहेत. याशिवाय २०१९ मध्ये बीसीसीआयचे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. क्रिकेट प्रशासनाचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे. शिवाय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे ते भाऊ आहेत.  (Jay Shah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.