Ind vs Ban, Test Series : संघ निवडीच्या पहिल्या परिक्षेत सूर्यकुमार, श्रेयस नापास; बांगलादेश मालिकेसाठी पत्ता कट?

Ind vs Ban, Test Series : बूचीबाबू करंडक स्पर्धेत श्रेयस आणि सुर्यकुमार हे ज्येष्ठ मुंबईकर फलंदाज पहिल्या सामन्यात अपयशी ठरले आहेत 

158
Ind vs Ban, Test Series : संघ निवडीच्या पहिल्या परिक्षेत सूर्यकुमार, श्रेयस नापास; बांगलादेश मालिकेसाठी पत्ता कट?
Ind vs Ban, Test Series : संघ निवडीच्या पहिल्या परिक्षेत सूर्यकुमार, श्रेयस नापास; बांगलादेश मालिकेसाठी पत्ता कट?
  • ऋजुता लुकतुके

भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम आता सुरू झाला आहे. दुलिप करंडकापूर्वी मुंबईत बूचीबाबू स्पर्धेचे सामने सुरू झाले आहेत. या स्पर्धेतील कामगिरीचा विचार नक्कीच बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना होणार आहे. पण, या पहिल्या परिक्षेत तरी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोघेही अपयशी ठरले आहेत. (Ind vs Ban, Test Series)

(हेही वाचा- Asana cyclone: ४८ वर्षांनंतर आसना चक्रीवादळानं गुजरातचं टेंशन वाढवलं)

कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बुची बाबू स्पर्धेत भाग घेत असलेला मुंबईचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सपशेल अपयशी ठरला. कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले आहे. या दोन फलंदाजांशिवाय मुंबईचे बाकीचे फलंदाज अपयशी ठरले. (Ind vs Ban, Test Series)

कोईम्बतूर येथे २७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबई आणि टीएनसीए-XI आमनेसामने आहेत. टीएनसीए-११ ने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३७९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी मुंबईने पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला पण सलामीवीर दिव्यांश सक्सेना वगळता एकाही फलंदाजाला आपली ताकद दाखवता आली नाही. टीएनसीएचा कर्णधार आर साई किशोरने मुंबईच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ गडी गमावून केवळ १८१ धावा करता आल्या. (Ind vs Ban, Test Series)

(हेही वाचा- ED Raids: उत्तराखंडमधील बनावट रजिस्ट्री घोटाळा प्रकरणी देशातील ५ राज्यांमध्ये ईडीची छापेमारी)

कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) सर्वाधिक नजरा खिळल्या होत्या. पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि अवघ्या ३ चेंडूत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. श्रेयस आऊट झाल्यानंतर सूर्या क्रीझवर आला आणि त्याच्याच शैलीत येताच त्याने वेगवान फलंदाजी सुरू केली. त्याच्या आणि दिव्यांशमध्ये ४० धावांची भागीदारी झाली, त्यापैकी ३० धावा सूर्याच्या होत्या. (Ind vs Ban, Test Series)

खडतर परिस्थितीत अडकलेल्या मुंबईला वाचवून आपली दावेदारी मांडण्याची सूर्याकडे चांगली संधी होती, पण तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. सूर्याने ३८ चेंडूत ३० धावांची खेळी खेळली. याशिवाय युवा फलंदाज मुशीर खानलाही केवळ १६ धावा करता आल्या. (Ind vs Ban, Test Series)

(हेही वाचा- Jay Shah : जय शाहांच्या जागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार?)

बूचीबाबू करंडकाबरोबरच ५ सप्टेंबरपासून दुलिप करंडकाचे सामने सुरू होणार आहेत. त्यामुळे या दोघांकडे निवड समिती सदस्यांवर छाप पाडण्यासाठी आणखीही संधी आहेत. (Ind vs Ban, Test Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.