Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांत भारत १० सुवर्ण जिंकू शकेल?

Paris Paralympics 2024 : टोकयो खेळांमध्ये भारताने विक्रमी १९ पदकं जिंकली होती 

193
Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांत भारत १० सुवर्ण जिंकू शकेल?
Paris Paralympics 2024 : पॅरालिम्पिक खेळांत भारत १० सुवर्ण जिंकू शकेल?
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅरालिम्पिकचे खेळ २८ ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. आणि स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही हात नसल्यामुळे पायाने तिरंदाजी करणारी भारताची शीतल देवीने राष्ट्रीय विक्रमासह आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत छाप पाडली आहे. क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या शीतलकडून आता अपेक्षा असेल ती पदकाचीच. या स्पर्धेत १२ क्रीडा प्रकारात भारताचे ८४ खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतीय पथकाकडून अपेक्षा आहे ती १० सुवर्ण पदकांची. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा- Tara Devi Temple: तारा देवी मंदिराचे ‘हे’ वैशिष्ट्य तुम्हाला माहित आहे का?)

२०२१ मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्णांसह विक्रमी १९ पदके जिंकली आणि क्रमवारीत २४ वं स्थानही मिळवलं होतं. तीन वर्षांनंतर सुवर्णपदकांची संख्या दुहेरी अंकात नेण्याचे आणि एकूण २५ हून अधिक पदके जिंकण्याचे भारताचे ध्येय आहे. जाणून घेऊया भारताच्या पदकांच्या दावेदार खेळाडूंविषयी (Paris Paralympics 2024)

१. सुमित अंतिल (पुरुष भालाफेक-एफ६४)

टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू सुमितकडून भारताला पुन्हा एकदा सुवर्णाची आशा आहे. सुमितने टोकियोमध्ये ६८.५५ मीटरचा विक्रमी थ्रो केला होता. टोकियोपासून, सुमितने पॅरिस २०२३ आणि कोबे २०२४ मधील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये २ सुवर्ण आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत. २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या चौथ्या पॅरा गेम्समध्ये त्याने ७३.२९ मीटर फेक करून विश्वविक्रम मोडला. पॅरिस पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात त्याला भारताचा ध्वजवाहक बनवण्यात आले. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा- PM Narendra Modi BKC: ‘सरस्वती बुद्धी वाटत होती, तेव्हा ते…’, मुंबईच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला  )

२. मरियप्पन थांगावेलू (पुरुषांची उंच उडी- टी६३)

पुरुषांच्या उंच उडीत, दोन वेळा पॅरालिम्पिक पदक विजेता मरियप्पन थांगावेलूने रिओ २०१६ मध्ये १.८९ मीटरच्या उडीसह सुवर्णपदक जिंकले आणि टोकियो २०२० मध्ये १.८६ मीटरच्या उडीसह रौप्यपदक जिंकले. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. यावेळी भारताला या स्पर्धेत एकापेक्षा जास्त पदके मिळू शकतात. मरियप्पन थंगावेलूसह शरद कुमार आणि शैलेश कुमार यांनाही पदकाच्या मोठ्या आशा आहेत. त्यात अमेरिकेच्या सॅम ग्रेव्ही आणि एझरा फ्रेंचचे आव्हान असेल. (Paris Paralympics 2024)

३. अवनी लखेरा (नेमबाजी)

मनू भाकरपूर्वी याच क्रीडा स्पर्धेत २ पदके जिंकणाऱ्या अवनी लखेराला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. अवनीने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णासह २ पदके जिंकली होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. अवनी ३ शूटिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा- Chandrakant Patil : विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षेत दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई…!)

४. शीतल देवी (तिरंदाजी)

१७ वर्षीय शीतल देवी यांनी तरुण वयातच नाव कमावले आहे. जगात फार कमी धनुर्धारी आहेत, जे शस्त्राशिवाय तिरंदाजी करतात. या पॅरालिम्पिकमधील तीन तिरंदाजांपैकी शीतल ही एक आहे जी पायांच्या मदतीने तिरंदाजी करेल. शीतलने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. यावेळी ती मिश्र आणि एकेरी स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे. (Paris Paralympics 2024)

५. कृष्णा नागर (बॅडमिंटन पुरुष एकेरी एसएच६)

प्रमोद भगतवर बंदी घातल्यानंतर भारतीय संघात फार कमी शटलर आहेत, ज्यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. त्यापैकी एक म्हणजे कृष्णा नागर, तो बॅडमिंटनच्या एसएच ६ प्रकारात तो सुवर्ण जिंकण्याचा प्रयत्न करेल. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा- Vishalgarh चे जतन करण्यासाठी बेकायदा बांधकामे हटविणे आवश्यक; पुरातत्व विभागाचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र)
६. मनीषा रामदास (बॅडमिंटन महिला एकेरी एसयु ५)

महिला बॅडमिंटन स्टार मनिषा, जिने २०२२ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुवर्ण आणि या वर्षाच्या सुरुवातीला रौप्यपदक जिंकले होते, तिच्याकडून पॅरालिम्पिक पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. भारताची थुलैमाथी मुरुगेसन ही या प्रकारातील अव्वल मानांकित खेळाडू आहे. (Paris Paralympics 2024)

७. भाविना पटेल (टेबल टेनिस, महिला एकेरी डब्ल्यू एस ४)

टोकियोमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक मिळवणे ही भारतासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने टोकियो गेम्समध्ये तिच्या रँकपेक्षा वरच्या १२ खेळाडूंचा पराभव करून रौप्य पदक जिंकले. ती पुन्हा एकदा पदक आणेल अशी अपेक्षा आहे. (Paris Paralympics 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.