पाकिस्तानशी अखंड चर्चेचे युग संपले आहे. जोपर्यंत जम्मू आणि काश्मीरचा संबंध आहे, कलम ३७० रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे आपण पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवू शकतो हा मुद्दा आहे. मला हे सांगायचे आहे की, आपण निष्क्रीय नाही आणि घटना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशा घेत असली तरी आपण कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ, असे कणखर प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी केले आहे.
(हेही वाचा – PM Modi Wadhvan Port Bhoomipujan: शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून माफी मागतो…)
भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या काही दिवसापासून संबंध चिघळले आहेत. दहा वर्षांपासून दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा थांबली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक संबंधांविषयी हे परखड वक्तव्य केले आहे. या वेळी एस. जयशंकर यांनी बांग्लादेश आणि मालदीवविषयीही वक्तव्य केले.
मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, काही दिवसापूर्वी बांगलादेशात सत्ताबदल झाला आहे. आम्हाला तत्कालीन सरकारशी बोलावे लागेल, हे स्वाभाविक आहे. राजकीय बदल झाले आहेत आणि ते विस्कळीत होऊ शकतात, हे आम्हाला मान्य करावे लागेल. मालदीवबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनात चढ-उतार आले आहेत. येथे स्थिरतेचा अभाव आहे. मालदीवशी आमचे जुने संबंध आहेत. हे नाते त्यांच्यासाठी ताकदीचे आहे, असा विश्वास मालदीवमध्ये आहे. या वेळी त्याच्यासाठी हे नाते खूप महत्त्वाचे आहे कारण ते आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community