स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत; PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

177
गेल्या काही काळापासून या भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला जातो. मात्र, त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. केंद्राच्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली 

नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडले ते दुर्दैवी होते. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाहीत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो. याचबरोबर, आमच्यावर वेगळे संस्कार आहेत. आम्ही ते लोक नाही आहोत, जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा करत आहेत. त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही. उलट अपमान करून न्यायालयात जातात, पण महाराष्ट्राची जनता आता त्यांच्या संस्कारांना ओळखत आहेत, असेही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

देशातील सर्वात मोठे पोर्ट 

देशातील सर्वात मोठे पोर्ट प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. हे देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट असणार आहे. देशच नाही तर जगातील सर्वात मोठे पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचे काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.