-
ऋजुता लुकतुके
रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्सच्या भागधारकांसाठी विस्ताराच्या विविध योजना तर होत्याच. रिलायन्स रिटेल्सच्या आयपीओबद्दलही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी भाष्य केलं. आणि त्याचवेळी रिलायन्स रिटेल्सला पूर्ण ताकद देण्यासाठी अंबानी यांनी रिटेल कंपनीच्या १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. या पंधरा जणांना मिळून तब्बल ३५१ कोटी रुपयांचे समभाग देऊ केले आहेत. (Reliance AGM)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत; PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)
रिलायन्स रिटेलने गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी केली आहे. त्यासाठी हे बक्षीस आहे. रिलायन्स रिटेलने रजिस्ट्रार ऑफ कंपनीला दिलेल्या फाइलिंगमध्ये ईएसओपी अंतर्गत उच्च कर्मचाऱ्यांना दिलेल्या समभागांची माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स ७९६.५ रुपये प्रति शेअर दराने विभागले गेले आहेत. कंपनीचे एकूण ४.४१७ दशलक्ष शेअर्स लाभार्थी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की जेव्हाही त्यांचा आयपीओ येईल तेव्हा बोर्ड ईएसओपी अंतर्गत वितरित समभागांची यादी करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. दरम्यान, आज होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये रिलायन्स रिटेलच्या आयपीओचा खुलासा केला जाऊ शकतो, असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. रिलायन्स रिटेलचा आयपीओ येत्या दोन वर्षांत लॉन्च होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. (Reliance AGM)
(हेही वाचा – Paris Paralympics : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराने उघडलं सुवर्ण पदकाचं खातं, मोना अगरवालला कांस्य)
ईएसओपीमध्ये करोडो रुपयांचे शेअर्स वितरित करण्यात आले आहेत. रिलायन्स रिटेलच्या ज्या कर्मचाऱ्यांना ईएसओपी अंतर्गत शेअर्स वितरित करण्यात आले आहेत, त्यामध्ये, संचालक व्ही सुब्रमण्यम, किराणा रिटेल दामोदर मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फॅशन आणि जीवनशैली व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अखिलेश प्रसाद, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलचे मुख्य व्यवसाय अधिकारी कौशल नेवरेकर यांचा समावेश आहे. तसेच अश्विन खसगीवाला आणि अजिओचे मुख्य कार्यकारी विनीत नायर यांचा समावेश आहे. तसेच रिलायन्स रिटेलने कामदेव मोहंती, मुख्य कार्यकारी अधिकारी, किराणा रिटेल आणि जिओमार्ट, प्रतिक माथूर, स्ट्रॅटेजी आणि प्रोजेक्ट हेड, रिलायन्स ट्रेंडचे मुख्य परिचालन अधिकारी विपिन त्यागी आणि केतन मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ESOP अंतर्गत शेअर्सचे वाटप केले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण मिटींग आज होणार आहे. या सभेपूर्वीच मुकेश अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. (Reliance AGM)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community