Assam सरकारचा मोठा निर्णय! नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी आता बंद

184
Assam सरकारचा मोठा निर्णय! नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी आता बंद
Assam सरकारचा मोठा निर्णय! नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी आता बंद

आसामच्या (Assam) विधानसभेमध्ये दर शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी दुपारी २ तासांची तासांची सुट्टी देण्यात येत होती. ही पंरपरा ब्रिटिशकालीन परंपरा होती, असं सांगितलं जातं. या दोन तासांच्या वेळेत दर शुक्रवारी मुस्लिम आमदार नमाज अदा करत होते. मात्र, आसाम सरकारने आज घेतलेल्या या निर्णयानंतर यापुढे ही सुट्टी मिळणार नाही. (Jumma Break)

(हेही वाचा –Assembly Elections : मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची घराणेशाही, वरूणला देणार वांद्रे पूर्वमधून उमेदवारी)

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आता मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी देण्यात येणारी दोन तासांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, यापुढे ही दोन तासांची सुट्टी मिळणार नाही.

(हेही वाचा –Alandi : प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी केला जातो कोट्यवधी रुपये खर्च)

“आसाम (Assam) विधानसभेची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि राज्यावरील वसाहतीचे ओझे दूर करण्याच्या उद्देशाने, जुम्मासाठी दर शुक्रवारी सभागृहाचे कामकाज २ तासांसाठी तहकूब करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. ही प्रथा १९३७ मध्ये मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी सुरू केली होती. भारतातील प्राचीन धर्मनिरपेक्ष मूल्ये जपण्याच्या या प्रयत्नासाठी आसाम विधानसभेच्या अध्यक्षांचे आणि सन्माननीय सदस्यांचे आभार.” असं मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Assam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.