BMC : ‘हिंदुस्थान पोस्ट’ चा अंदाज खरा ठरला….डॉ शिंदे यांच्या जागी डॉ. विपिन शर्माच

Hindustan Post Exclusive : तब्बल एक महिन्यानंतर अतिरीक्त आयुक्त पद भरले,

1490
Hindustan Post Exclusive : 'हिंदुस्थान पोस्ट' चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे यांच्या जागी डॉ. विपिन शर्माच
Hindustan Post Exclusive : 'हिंदुस्थान पोस्ट' चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे यांच्या जागी डॉ. विपिन शर्माच
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांना त्यांच्या मूळ जागेवर परत पाठवल्याने रिक्त झालेल्या या पदावर तब्बल एक महिन्याने डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉ विपिन शर्मा यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी पी वेलारासू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रोजी हिंदुस्तान पोस्टने डॉ.सुधाकर शिंदे यांच्या जागी डॉ. विपिन शर्मा यांची नियुक्ती होईल असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज खरा ठरला. (BMC)
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची बदली त्यांच्या मुळ खात्यात झाल्यामुळे महापालिकेतील हे पद रिक्त झाले आहे. परंतु रिक्त पद पुढील काही दिवसांमध्ये भरले जाणार नाही याच विचाराने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी शिंदे यांच्याकडे विविध खाते व विभाग हे तिन अतिरिक्त आयुक्तांमध्ये विभागणी करून  सोपवले आहे. त्यामुळे महापालिकेत प्रथमच बदली झालेल्या एका अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग व खात्यांचा एकत्र पदभार एकाच अतिरिक्त आयुक्ताकडे सोपवण्यासाठी ऐवजी त्यांची विभागणी करून सोपवली आहे. (BMC)
 मागील ३१ जुलै २०२४ रोजी अतिरिक्त  आयुक्त पदी असलेल्या डॉ. सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांना स्वगृही  पाठवत त्यांची बदली केल्यानंतर हे पद रिक्त होते.  या पदी अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ  विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तर कोकण विभागीय आयुक्त पदी असलेल्या पी वेलरासू यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (BMC)
डॉ विपीन शर्मा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २००५च्या केडरचे असून  यापूर्वी त्यांनी  पुणे आणि ठाणे महानगर पालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे नागरि कामांचा अनुभव विचारात घेता त्यांची वर्णी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे. (BMC)
यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची ३० एप्रिल २०२२ रोजी सेवा निवृत झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी २४ मे २०२२ रोजी आशिष शर्मा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.म्हणजे तब्बल २५ ते २६ दिवसांनी हे पद भरले गेले.  तसेच  महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदी असणारे श्रावण हर्डींकर यांच्या बदलीनंतर तब्बल ४५ दिवसांनी हे पद भरले गेले. तब्बल दीड महिन्यांनी हर्डीकर यांच्या रिक्त जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून १४ सप्टेंबर २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.  तर यावेळेस हे पद ३१ दिवस  रिक्त राहिले..  (BMC)
हेही पहा-  
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.