Shikhar Savarkar Purskar 2024 जीवन गौरव पुरस्कार चंद्रप्रभा ऐतवाल, उत्कृष्ट गिर्यारोहक इंद्रनिल खुरांगळे आणि उत्कृष्ट संस्था सिस्केप

गिर्यारोहण या साहसप्रचुर क्षेत्रातील साहसवीरांना प्रोत्साहन म्हणून स्मारकातर्फे सन २०२० पासून शिखर सावरकर हे गिर्यारोहणविषयक साहस पुरस्कार (Shikhar Savarkar Purskar 2024) सुरु करण्यात आले.

292

गिर्यारोहण क्षेत्रात अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेल्या शिखर सावरकर साहस पुरस्कार-२०२४ (Shikhar Savarkar Purskar 2024) ची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथून करण्यात आली. यंदाच्या वर्षी शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल यांना जाहीर झाला आहे, तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कार इंद्रनिल खुरांगळे आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार सिस्केप संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. यावेळी स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, ज्येष्ठ महिला गिर्यारोहक, स्मारकाच्या सदस्या सरस्वती क्रिश, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल यांना ४ दशकांपासून गिर्यारोहणाचा अनुभव 

गिर्यारोहण हा प्रामुख्याने साहसाधारित खेळ असला तरी यामध्ये शिस्त, संयम आणि सातत्य या गुणांना अतिशय महत्व आहे. या गुणांमुळेच जुन्या पिढीत आपली कारकिर्द गाजवलेले व साहसाच्या क्षितिजावर आपले नाव कोरलेले अनेक ज्येष्ठ, वरिष्ठ गिर्यारोहक या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात निर्विवादपणे नाव राखून आहेत. यापैकीच एक उल्लेखनीय नाव म्हणजे दिदी अर्थात् चंद्रप्रभा ऐतवाल. मागील ३०-४० वर्षांत हिमालयातील अनेक थरारक मोहिमा आणि त्यावरील तितक्याच थरारक यशांमध्ये त्यांचा सहभाग, नेतृत्व अवर्णनीय आहे. पुरुषांची मक्तेदारी असली तरी त्या काळात एक महिला या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात आपले वर्चस्व राखते, गाजवते हेच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळेच यंदाच्या शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराकरीता (Shikhar Savarkar Purskar 2024) गिर्यारोहण विश्वात चंद्रादिदी या नावाने प्रसिद्ध असलेल्या विख्यात चंद्रप्रभा ऐतवाल यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. चंद्रादिदींच्या प्रदिर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण गिर्यारोहण कारकिर्दीची भारत सरकारने विशेष दखल घेऊन त्यांना अर्जुन पुरस्कार, तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि पद्मश्री या अत्युच्च पुरस्कारांनी याआधीच सन्मानपूर्वक गौरविण्यात आले आहे.

अल्पावधीतच गिर्यारोहण क्षेत्रात वेगळी उंची गाठलेल्या इंद्रनिल खुरांगळे  

गिर्यारोहण हा प्रचंड साहसी खेळ आहे. सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतराजीतील प्रस्तरारोहण हा तर साहसाचा एक संपूर्ण वेगळा अध्याय ठरतो. सह्याद्री पर्वत रांगेतील विशाल कातळभिंती आणि अभेद्य आव्हानात्मक सुळक्यांवर सुरक्षेच्या नियमांचे शास्त्रशुद्धरीत्या पालन करीत चढून जाणे हा या खेळाचा आत्मा आहे. अशा प्रचंड साहसी क्षेत्रात आपल्या सुंदर व भेदक चढाईद्वारे अल्पावधीतच एक वेगळी उंची गाठलेल्या इंद्रनिल खुरांगळे या पुणे येथील उमद्या गिर्यारोहकाने यंदाच्या शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक या पुरस्कारावर (Shikhar Savarkar Purskar 2024) आपले नाव कोरले आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत; PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)

वन्य जीवांचे रक्षण, संवर्धन कार्यात मोलाची कामगिरी करणारी सिस्केप संस्था 

गिर्यारोहण संस्था ही केवळ एक नामधारी गिर्यारोहण संस्था असू नये. तर अशा संस्थांमार्फत गिर्यारोहणाचे कौशल्य आणि तांत्रिक साधनसामुग्रीचा वापर गिर्यारोहणाखेरीज जनहितार्थ, पूर, भूकंप, अपघात अशा आपत्तीजनक प्रसंगी किंवा संकटात सापडलेल्या जिवांच्या रक्षणासाठीही उपयुक्त ठरले पाहिजे. त्यामुळे गिर्यारोहण केवळ डोंगरात खेळला जाणारा क्रिडाप्रकार न ठरता तो अशा लोककार्यातून अधिक लोकाभिमुख ठरला पाहिजे. अशाच संकल्पनेतून यंदाच्या वर्षी शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था या पुरस्काराकरीता (Shikhar Savarkar Purskar 2024) गिर्यारोहणाबरोबरच वन्य जीवांचे रक्षण व संवर्धन कार्यात मोलाची कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील सिस्केप या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित हिमालयीन मोहिमेत एक इतिहास घडवण्यात आला. देशभरातून निवडलेल्या स्मारकाच्या पथकाने हिमाचल प्रदेशातील बातलजवळचे एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर यशस्वीरीत्या सर केले. या हिमशिखरास आपण शिखर सावरकर म्हणून ओळखतो. २३ ऑगस्ट २०१५ रोजीच्या या अभिमानास्पद थरारपूर्ण घटनेच्या स्मृती जपण्यासाठी तसेच गिर्यारोहण या साहसप्रचुर क्षेत्रातील साहसवीरांना प्रोत्साहन म्हणून स्मारकातर्फे सन २०२० पासून शिखर सावरकर हे गिर्यारोहणविषयक साहस पुरस्कार (Shikhar Savarkar Purskar 2024) सुरु करण्यात आले आहेत.

गिर्यारोहण हा एक जागतिक साहसी क्रीडाप्रकार असला तरी त्याबरोबरच वाढत्या आधुनिकीकरणात त्यातील खरा रोमांच, वेगळेपणाचे वैविध्य आणि सामाजिक उत्तरदायित्व देखील प्रकर्षाने सांभाळले जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या अभिमानास्पद पुरस्काराकरीता गिर्यारोहणातील अत्युच्च साहसाने गौरवांकीत व्यक्तिमत्वांबरोबरच, निव्वळ गिर्यारोहणापेक्षा त्यातील साहसावर आधारित सामाजिक उपक्रम आणि नवोदितांच्या वैविध्यपूर्ण वैयक्तिक साहसकार्यांची नोंद शिखर सावरकर साहस पुरस्कारांद्वारे (Shikhar Savarkar Purskar 2024) घेतली जाते. या वर्षीच्या पुरस्कारप्रदान सोहळ्याच्या आयोजनाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.