Star – Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?

Star - Reliance Merger : रिलायन्सची वायकॉम १८ आणि डिस्नी स्टार इंडिया या कंपन्यांच्या विलिनीकरणातून देशातील सगळ्यात मोठी मीडिया कंपनी उभी राहत आहे.

134
Star - Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?
Star - Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स समुहातील वायकॉम १८ आणि डिस्नी स्टार या कंपन्यांच्या विलिनीकरणाला (Star – Reliance Merger) आता केंद्रीय कंपनी नियम प्राधिकरणानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे देशातील दोन मोठ्या मीडिया कंपन्यांच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला कंपनी स्पर्धा मंडळ अर्थात सीसीआयनेही या कराराला मान्यता दिली होती. या विलिनीकरणातून देशातील ७०,३५० कोटी रुपये आकाराची नवीन मीडिया कंपनी अस्तित्वात येणार आहे. आणि १०२ वाहिन्या तसंच २ ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म या नवीन कंपनीकडे असतील.

नवीन कंपनी चालणार कशी, त्यासाठी स्टार आणि रिलायन्समध्ये काय करार झालाय ते इथं समजून घेऊया.

(हेही वाचा – Manu Bhaker : ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती मनु भाकर आणि सचिन तेंडुलकरची ग्रेट भेट)

नवीन कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी १६.३४ टक्के, वायकॉम १८ ची ४६.८२ टक्के आणि स्टार इंडियाची ३६.८४ टक्के इतकी भागिदारी असेल. त्यामुळे नवीन कंपनीवर नियंत्रण हे वायकॉम १८ चं असेल. रिलायन्स समुहाने नवीन कंपनीसाठी ११,००० कोटी रुपयांच्यावर पैसे टाकले आहेत. वायकॉम १८ ही रिलायन्सच्या नियंत्रणाखाली असलेलीच कंपनी आहे. (Star – Reliance Merger)

नवीन कंपनीच्या अध्यक्षपदी नीता अंबानी (Nita Ambani) असतील. तर स्टार इंडियाचे उदय शंकर कंपनीचे उपाध्यक्ष असतील. मीडिया कंपनीच्या नवीन संचालक मंडळात ५ सदस्य रिलायन्सचे ३ स्टारचे आणि २ स्वतंत्र सदस्य असतील. इथून पुढे कंपनीचा दृष्टिकोण डिजिटल प्रसारणाला प्राधान्य देणारा असेल हे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. (Star – Reliance Merger)

विलिनीकरणानंतर देशातील ही सगळ्यात मोठी मीडिया कंपनी असेल. आणि तिची स्पर्धा सोनी, झी, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम यांच्याशी असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.