Dadar Hawker : हप्ता वाढला, फेरीवाल्यांवरील कारवाई बंद

895
Dadar Hawker : हप्ता वाढला, फेरीवाल्यांवरील कारवाई बंद
Dadar Hawker : हप्ता वाढला, फेरीवाल्यांवरील कारवाई बंद
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दादर रेल्वे स्थानक परिसरासह मुंबईतील २० ठिकाणी सुरु असलेली फेरीवाल्यांवरील कारवाई सणाच्या कालावधीतही सुरु राहील. त्यात खंड पडणार नाही असे वारंवार महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा एकदा फेरीवाले बिनधास्तपणे मंडप बांधून व्यावसाय करताना दिसत आहे. त्यामुळे कारवाई करणारे महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस कुठे गेले असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आता हप्ता वाढून मिळाला म्हणून कारवाई थांबवली अशाप्रकारच्या प्रतिक्रियाच दादरमध्ये ऐकायला मिळत आहेत. (Dadar Hawker)

WhatsApp Image 2024 08 31 at 6.39.41 PM

मुंबई महापालिकेच्यावतीने दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या फेरीवाल्यांविरोधात मागील काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकासमोरील केशव सुत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील जागांसह रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु ही कारवाई सुरु असल्याने दादरकरांना रस्त्यावर मोकळेपणाने चालता येत होते. (Dadar Hawker)

(हेही वाचा – लाडकी बहीण योजना आणून आम्ही चूक केली का? उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सवाल)

परंतु, उत्सवाच्या काळात ही कारवाई थांबेल, त्यामध्ये शिथिलता दिसून येईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण ही कारवाई आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि पोलिसांच्या मदतीने होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु हंडीचा कार्यक्रम उरकताच दादर पश्चिम येथील रानडे मार्गाला जोडणाऱ्या छबिलदास गल्लीत मंडप उभारुन त्याठिकाणी गणेशोत्सवाचे साहित्य विकण्यास सुरुवात झाली आहे. छबिलदास गल्ली वगळता कुठेही मंडप उभारले नसून हा भाग रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या परिसरात येत आहेत.

WhatsApp Image 2024 08 31 at 6.39.41 PM 1

मुस्लिम फेरीवाल्यांचे मंडप आणि सामान जप्त करण्याची नाही हिंमत !

शनिवारी सकाळी रानडे मार्गावरील फेरीवाले गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य विक्रीकरता बसले होते. यावेळी महापालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकाऱ्याने परफेक्ट शुजच्या बाहेर गणपतीकरता पडदे विक्रीसाठी लावले होते, तो पडद्याचा कपडा जप्त केला. परंतु तिथे पुढे दहा पावलांवर रानडे मार्ग आणि छबिलदास मार्गाच्या जोड मार्गावर मुस्लिम फेरीवाले गणपतीचे पडदे मंडप बांधून विकत आहेत. त्याला मात्र या अधिकाऱ्यांना प्रेमाने समजावत मंडप काढ म्हणून सांगितले. परंतु त्यांचे साहित्य जप्त केले नाही. पण त्या मुस्लिम फेरीवाल्याने त्यानंतरही मंडप हटवला नाही की आपला धंदा बंद केला नाही. त्यामुळे महापलिकेचे अधिकारी केवळ धर्म आणि व्यक्ती बघून कारवाई करतात का असा सवाल येथील फेरीवाल्यांकडून केला जात आहे. (Dadar Hawker)

WhatsApp Image 2024 08 31 at 6.39.41 PM 2

(हेही वाचा – RSS: केरळमध्ये RSSची तीन दिवसीय समन्वय बैठक सुरू)

शनिवारी महापालिकेला सुट्टी असल्याने तसेच गणेशोत्सवाच्या खरेदीकरता तसा शेवटचा शनिवार असल्याने गावाला जाणारे चाकरमनी खरेदीकरता मोठ्याप्रमाणात दादरला आले होते. त्यामुळे या भागात फेरीवाल्यांवरील कारवाईचा कोणताही परिणाम दिसून येत नसून उलट स्टेशन परिसरात डिसिल्व्हा मार्ग, जावळे मागे, रानडे मार्ग आणि छबिलदास गल्लीत मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांनी आपले धंदे थांटले होते. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांवर कारवाई करता येवू नये म्हणून दुपारी पावणे चार वाजताच येथील सर्व महापालिकेच्या गाड्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे चोर गाड्या निघून गेल्यानंतर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास रान मोकळे झाले. त्यामुळे दादरचा परिसरत खरेदीकरता गर्दीने फुलून गेल्याचे पहायला मिळत होते. (Dadar Hawker)

WhatsApp Image 2024 08 31 at 6.39.40 PM

मात्र, मागील काही दिवसांपून सुरु असलेल्या कारवाईमुळे समाधान व्यक्त करणाऱ्या रहिवाशांकडून आणि प्रवाशांकडून आता या कारवाईतील शिथिलतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता त्यांचे हप्ते वाढून मिळाले असतील, म्हणून कारवाई होत नाही, त्यांना जनतेच्या समस्यांशी काही पडलेले नसून त्यांची बांधिलकी चिरीमिरीशीरच असल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे जी कारवाई जनतेला त्रास होतो म्हणून हाती घेतली होती, ती कारवाई आता का थांबली आणि थेट मंडप बांधून साहित्य विकेपर्यंत महापालिकेचे अधिकारी हे सर्व कसे सहन करतात असाही सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. (Dadar Hawker)

(हेही वाचा – US Open 2024 : कार्लोस अल्काराझची १५ सामन्यांची विजयी मालिका तोडणारा बोटिक फान दे शाल्सशुप कोण आहे?)

फेरीवाल्यांवरील कारवाईमागे असे असते गणित

केशवसुत उड्डाणपुलाखाली भाग : कायम कारवाई

जावळे मार्ग : अधून मधून कारवाई

डिसिल्व्हा रोड : कारवाई शुन्य

रानडे मार्ग : कारवाई अधिक

छबिलदास मार्ग : कारवाई शुन्य

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.