न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलिस निरीक्षक सुनील माने याचा एनआयएला ताबा मिळाला असून, प्रदीप शर्मा आणि इतर ४ आरोपींना समोर ठेऊन सुनील मानेची चौकशी करण्यात येणार आहे. ११ जून रोजी अटक करण्यात आलेल्या संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांची एनआयए कोठडी संपली होती. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयातून ताबा घेण्यात आलेल्या सुनील माने आणि संतोष शेलार, आनंद जाधव या तिघांना 25 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
होणार समोरासमोर चौकशी
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मा, सुनील माने आणि इतर आरोपींची आता समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. प्रदीप शर्मा यांनी रोज वकिलाला भेटायची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती, त्यानुसार त्यांना वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. रोज 20 मिनिटे त्यांना आपल्या वकिलाला भेटता येणार आहे.
(हेही वाचाः पुरावे जुळवण्यासाठी एनआयएने केली आरोपींची डीएनए चाचणी)
एनआयए कोठडीत वाढ
संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या सांगण्यावरुन मनसुखची हत्या केल्याचा एनआयएला संशय आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी एनआयएने न्यायालयात त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दोघांची अजून 10 दिवसांची कोठडी हवी आहे. या प्रकरणातले आणखी काही आरोपी फरार आहेत त्याची माहिती या आरोपींकडून मिळू शकते, म्हणून त्यांची कोठडी वाढवून हवी आहे, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली. त्यानुसार संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना 25 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community