Sunita Williams यांचा अंतराळात मुक्काम आणखी वाढला; कल्पना चावलाच्या अपघातामुळे नासाचा सावध पवित्रा

सुनीता (Sunita Williams) आणि विल्मोर 13 जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले.

155

बोईंगच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे अंतराळवीर कल्पना चावला. खरं तर, 1 फेब्रुवारी 2003 रोजी, भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचे कोलंबिया अंतराळ यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच फुटले आणि जळून गेले. या अपघातात कल्पनांसह 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नासाने आपल्या अंतराळवीरांबाबत अधिक काळजी घेतली आहे.

नासाचे प्रमुख बिल नेल्सन म्हणाले, “त्या अपघाताचा आमच्या निर्णयांवर खोलवर परिणाम झाला. त्यावेळी नासाकडून चुका झाल्या होत्या. तेव्हा येथील वातावरण खूप वेगळे होते. ज्युनियर फ्लाइट इंजिनीअर्सच्या शब्दांकडे आणि इशाऱ्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात होते. पण आता आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांचे विचार मांडण्याची संधी देतो.” अंतराळवीरांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे, अंतराळ उड्डाण नेहमीच धोकादायक असते. नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्सच्या (Sunita Williams) बाबतीत त्यांना बोईंग यानाने न आणण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बिल नेल्सन म्हणाले की, सर्वात सुरक्षित प्रवासादरम्यानही अंतराळ उड्डाण अत्यंत धोकादायक ठरू शकते. आमच्यासाठी अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

हरियाणातील कर्नाल येथे जन्मलेल्या कल्पना चावला 16 जानेवारी 2003 रोजी नासाच्या अंतराळ वाहन कोलंबिया स्पेस शटलमधून अवकाशात झेपावल्या. 15 दिवसांचा प्रवास पूर्ण करून त्या 1 फेब्रुवारीला पृथ्वीवर परतत असताना त्यांचे यान लँडिंगपासून 16 मिनिटांनी क्रॅश झाले. यामध्ये सर्व 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला. याशिवाय 28 जानेवारी 1986 रोजी पृथ्वीवर परतत असताना स्पेस शटल चॅलेंजरचाही स्फोट झाला. या अपघातात 14 अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.

(हेही वाचा Shikhar Savarkar Purskar 2024 जीवन गौरव पुरस्कार चंद्रप्रभा ऐतवाल, उत्कृष्ट गिर्यारोहक इंद्रनिल खुरांगळे आणि उत्कृष्ट संस्था सिस्केप)

85 दिवसांपासून अवकाशात अडकल्या सुनीता

नासाने 24 फेब्रुवारीला सांगितले होते की, सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर फेब्रुवारी 2025 पर्यंत पृथ्वीवर परततील. ISS वर अडकलेल्या दोन अंतराळवीरांना बोइंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आणणे धोकादायक ठरू शकते हे नासाने अखेर मान्य केले. दोन्ही अंतराळवीरांना याच अंतराळयानाने 5 जून रोजी आयएसएसमध्ये पाठवण्यात आले होते. नासाने सांगितले होते की सुनीता आणि बुच विल्मोर फेब्रुवारीमध्ये एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून परततील. त्याच वेळी, स्टारलाइनर कॅप्सूल आयएसएसपासून वेगळे होईल आणि एक किंवा दोन आठवड्यात ऑटोपायलट मोडवर परतण्याचा प्रयत्न करेल. नासाचे अधिकारी बिल नेल्सन म्हणाले होते, ‘बोइंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय पृथ्वीवर परत येईल.’ सुनीता (Sunita Williams) आणि विल्मोर 13 जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले.

इतके दिवस अंतराळात कसे अडकले?

स्टारलाइनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या होत्या. यामुळे 5 जूनपूर्वीही अनेक वेळा प्रक्षेपण फेल झाले होते. प्रक्षेपणानंतरही अंतराळयानामध्ये समस्या असल्याच्या बातम्या येत होत्या. नासाने सांगितले की, अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये एक लहान हीलियम गळती आहे. अंतराळ यानामध्ये अनेक भ्रस्टर्स असतात. त्यांच्या मदतीने अंतराळयान आपला मार्ग आणि वेग बदलते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.