महिला अत्याचार प्रकरणी जलद न्यायाची गरज- PM Narendra Modi

97
महिला अत्याचार प्रकरणी जलद न्यायाची गरज- PM Narendra Modi
महिला अत्याचार प्रकरणी जलद न्यायाची गरज- PM Narendra Modi

महिलांच्या सुरक्षेसाठीचे (Women Safety) कठोर कायदे सक्रीय करण्याची आणि महिलांसंदर्भातील गुन्ह्यात जलद न्याय (speedy justice) देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या 75 वर्षानिमित्त स्टॅम्प आणि नाणे अनावरण (75th Anniversary Stamp and Coin Unveiled) प्रसंगी ते बोलत होते. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग)

याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, महिलांवरील अत्याचार आणि लहान मुलांची सुरक्षा हे गंभीर सामाजिक चिंतेचे विषय आहेत. या प्रकरणांमध्ये जितक्या वेगाने निर्णय घेतले जातील तितकी निम्म्या लोकसंख्येला सुरक्षिततेची खात्री दिली जाईल. न्यायातील दिरंगाई दूर करण्यासाठी गेल्या दशकात अनेक पातळ्यांवर काम करण्यात आले आहे. (PM Narendra Modi)

गेल्या दहा वर्षांत देशाने न्यायिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 8 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या 25 वर्षांत न्यायालयीन पायाभूत सुविधांवर दरवर्षी खर्च होणाऱ्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम गेल्या 10 वर्षांतच खर्च झाली असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. आपल्या लोकशाहीत न्यायपालिकेला राज्यघटनेचे संरक्षक मानले जाते, ही स्वतःच एक मोठी जबाबदारी आहे. आपण समाधानाने म्हणू शकतो की, आपल्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्यायव्यवस्थेने ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.  (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Novak Djokovic : युएस ओपनमध्ये कार्लोस अल्काराझच्या पाठोपाठ नोवाक जोकोविचचं आव्हानही संपलं)

स्वातंत्र्यानंतर न्यायव्यवस्थेने न्यायाच्या भावनेचे रक्षण केले, जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा न्यायव्यवस्थेने राष्ट्रीय हिताला सर्वोच्च ठेवून भारताच्या एकात्मतेचे रक्षण केले, असेही मोदींनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचा 75 वर्षांचा प्रवास हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही, तर तो भारताच्या संविधानाचा आणि घटनात्मक मूल्यांचा प्रवास आहे. या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक ज्ञानी व्यक्तींचे योगदान आहे. पिढ्यानपिढ्या या प्रवासात त्या करोडो देशवासीयांचे ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला त्‍यांचे योगदान आहे. सुप्रीम कोर्टाने लोकशाही मातेचा अभिमान आणखी वाढवल्याचे मोदींनी सांगितले. (PM Narendra Modi)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.