Gautam Adani Net Worth : मुकेश अंबानी यांना मागे टाकून गौतम अदानी पुन्हा एकदा सगळ्यात श्रीमंत भारतीय

ताज्या अहवालावरुण भारतीय श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

135
  • ऋजुता लुकतुके

जानेवारी २०२२ मध्ये हिंडेनबर्ग अहवालानंतर भारतीय उद्योजक आणि अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांना जोरदार धक्का बसला. आणि ते जगातील श्रीमंतांच्या यादीतून पहिल्या दहांतून बाहेर फेकले गेले. कंपनीचे शेअर तेव्हा १०० टक्क्यांहून जास्त खाली कोसळले होते. आता पुढील दोन वर्षांत अदानी समुह या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. आणि २०२३ मध्ये तर ९५ टक्के नुकसान भरून काढत गौतम अदानी पुन्हा एकदा भारतातील आणि आशियातीलही सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून विराजमान झाले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ११.६ लाख कोटी रुपये इतकी आहे. तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण मालमत्ता १०.१४ लाख कोटी रुपये इतकी आहे. (Gautam Adani Net Worth)

ताज्या अहवालावरुण भारतीय श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

(हेही वाचा – Assembly Elections : वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत होणार वाद)

(हेही वाचा – Bike Accident : आरेच्या पिकनिक पॉईंट येथे भीषण अपघात, तीन ठार)

६२ वर्षीय अदानी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीतही सध्या १७ व्या क्रमांकावर आहेत. १९८८ साली एका छोट्या कमोडिटी ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीने त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. अदानी एंटरप्रायजेस ही त्यांची पहिली कंपनी. पण, पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रात गौतम अदानींना रस होता. आणि बंदर व विमानतळ विकासाच्या माध्यमातूनच त्यांनी आताचं अदानी उद्योगसमुहाचं साम्राज्य उभं केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी गौतम अदानींचे निकटचे संबंध आहेत. आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर २०१५ पासून त्यांची औद्योगिक भरभराटही झाली आहे. गौतम अदानींची बहुतेक उत्पन्न हे त्यांच्या समुहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यातून येतं. अदानी समुहातील सात कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. आणि या कंपन्यांचे शेअर मागच्या पाच वर्षांत तिपटीहून जास्त वाढले आहेत. त्यातूनच गौतम अदानींची मालमत्ता वाढली आहे. (Gautam Adani Net Worth)

सध्या अदानी समुहाचा महसूल हा ३२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. बंदर व विमानतळ विकास तसंच व्यवस्थापन, हरित ऊर्जा, ऊर्जा निर्मिती, सिमेंट अशा उद्योगांमध्ये अदानी समुह प्रामुख्याने काम करतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.