Paris Paralympic Games : रुबिना फ्रान्सिसला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य

रुबिनाने या पॅरालिम्पिक खेळातील भारताचं नेमबाजीतील चौथं पदक जिंकलं.

83
Paris Paralympic Games : रुबिना फ्रान्सिसला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य
Paris Paralympic Games : रुबिना फ्रान्सिसला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांत (Paris Paralympic Games) भारताच्या रुबिना फ्रान्सिसने (Rubina Francis) १० मीटर एअर पिस्तुल एसएच३ प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेतील भारताचं आतापर्यंत हे पाचवं पदक आहे. पात्रता फेरीत सातव्या स्थानावर असलेली रुबिना (Rubina Francis) अंतिम फेरीत मुसंडी मारत तिसऱ्या स्थानावर पोहोचली. तिने एकूण २११.१ गुण मिळवले. नेमबाजांनी यंदा पॅरालिम्पिक खेळांत (Paris Paralympic Games) चांगली कामगिरी केली आहे. आणि नेमबाजीत भारताला मिळालेलं हे चौथं पदक आहे.

(हेही वाचा – Sunita Williams यांचा अंतराळात मुक्काम आणखी वाढला; कल्पना चावलाच्या अपघातामुळे नासाचा सावध पवित्रा)

यापूर्वी अवनी लेखरा (Avani Lekhara) आणि मोना अगरवाल (Mona Aggarwal) यांनी १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्य जिंकून दिलं होतं. अवनीसाठी तर हे तिसरं पॅरालिम्पिक पदक आणि सलग दुसरं सुवर्ण ठरलं. तर पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एसएच१ प्रकारात मनिष नरवालनेही रौप्य जिंकलं होतं. आता रुबिनाने (Rubina Francis) या पदकांमध्ये कांस्य पदकाची भर घातली आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT ची पोस्टरबाजी झाली बूमरँग)

एसएच१ हा प्रकार अशा दिव्यांग नेमबाजांसाठी आहे जे हाताने व्यवस्थित आपली रायफल किंवा पिस्तुल पकडू शकतात. आणि उभं राहून किंवा व्हीलचेअरमध्ये बसून नेमबाजी करू शकतात. या प्रकारात इराणच्या जावनमारडीने २३६.८ गुणांसह सुवर्ण जिंकलं. तर रौप्य पदक टर्कीच्या ईसेल ओझगेनला मिळालं.

मध्यप्रदेशची २५ वर्षीय नेमबाज रुबिना ही पॅरालिम्पिक खेळांमध्ये (Paris Paralympic Games) पिस्तुल प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज आहे. रुबिनाची घरची परिस्थिती बेताचीच आहे. वडील दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करतात. तर जन्मापासूनच रुबिनाच्या पायात व्यंग आहे. पण, २०१४ मध्ये तिने नेमबाजीची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला पाठिंबाच दिला. आर्थिक खर्च मात्र त्यांना झेपणारा नव्हता. त्यामुळे तिला प्रशिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण, रुबिनाने हार मानली नाही. सरकारी पाठिंबा मिळवत तिने सराव सुरूच ठेवला. आणि आता ती पॅरालिम्पिक पदकापर्यंत पोहोचली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.