हरयाणा विधानसभा (Haryana Legislative Assembly) निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शनिवारी (३१ ऑगस्ट) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने हरियाणातील मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. नवीन तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून, हरियाणाबरोबर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या (Jammu and Kashmir Assembly Elections) निकालाची तारीख बदलण्यात आली आहे. (Haryana Assembly Election)
हरियाणा विधानसभेच्या मतदानाची तारीख आता बदलण्यात आली आहे. याआधी घोषणा झाल्यानुसार १ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू आणि काश्मीरचीही मतमोजणी आता ८ ऑक्टोबर रोजीच होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
(हेही वाचा – Sunita Williams यांचा अंतराळात मुक्काम आणखी वाढला; कल्पना चावलाच्या अपघातामुळे नासाचा सावध पवित्रा)
९० जागांसाठी निवडणूक
९० जागांसाठी हरियाणा विधानसभेची निवडणूक होत आहे. एकाच टप्प्यात राज्यात मतदान होणार असून, निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याचे आधी जाहीर केले होते. आता तारीख बदलून ५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाणार होता. आता ८ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्म काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. (Haryana Assembly Election Dates)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community