कोणत्या सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अत्याचार? National Crime Records Bureauची धक्कादायक आकडेवारी

207
कोणत्या सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अत्याचार? National Crime Records Bureauची धक्कादायक आकडेवारी
कोणत्या सरकारच्या काळात महिलांवर सर्वाधिक अत्याचार? National Crime Records Bureauची धक्कादायक आकडेवारी

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. लोकांनी या घटनांविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय वातावरणही तापलं आहे. विरोधी पक्षांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला. या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची (एनसीआरबी) (National Crime Records Bureau) आकडेवारी समोर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांच्या संख्येत वाढ होतानाच दिसत आहे.

कोविड लॉकडाऊनची आकडेवारी
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या काळात, कोविड लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या दररोज सरासरी 109 घटना नोंदवल्या जात होत्या. आजही महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत नविन आकडेवारीवरु हे दिसून येत आहे. 2020 च्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात 31,701 महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. प्रतिदिन 88 महिला अत्याचाराला बळी पडत होत्या. मात्र, 2021 मध्ये हा आकडा 39,266 वर पोहोचला. दररोज महिला अत्याचाराच्या 109 घटना नोंदवल्या गेल्या. (National Crime Records Bureau)

महिला अत्याचाराच्या घटनांची मविआच्या काळाइतकीच संख्या आजही
जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण २२,८४३ घटना महिला अत्याचाराच्या घडल्या. त्याची सरासरी १२६ घटना प्रतिदिवस इतकी आहे. ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या ६ महिन्यात २०,८३० घटना घडल्या. याची सरासरी ११६ घटना प्रतिदिवस इतकी येते. आता २०२३ मध्ये २०२२ इतक्याच घटना असून, त्याची सरासरी सुद्धा १२६ घटना प्रतिदिवस इतकी येते. याचाच अर्थ कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी सरासरी होती, तितक्याच घटना आज महाराष्ट्रात होत आहेत. एकूणच महिला अत्याचाराच्या घटनांची मविआच्या काळाइतकीच संख्या आजही दिसून येते. (National Crime Records Bureau)

यातही अल्पवयीन मुलींवरचे अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम १२, भादंवि ५०९) या श्रेणीतील गुन्हे पाहिले तर त्यात अचानकच २०२१ पासून मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे २०१७ मध्ये ९४, २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये ९४, २०२० मध्ये ४८ इतके होते. ते २०२१ पासून अचानक वाढले आणि ती संख्या २४९ वर पोहोचली. २०२२ मध्ये ही संख्या ३३२ इतकी आहे. यातील जून २०२२ पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. (National Crime Records Bureau)

एकिकडे हा कल दिसत असताना १८ वर्षांपेक्षा वरील मुलींच्या बाबतीत विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात १३१७ गुन्हे नोंदले होते, ते २०२३ मध्ये १२०८ इतके नोंदले गेले. महिलांवरील भादंवि ३५४ च्या गुन्ह्यांमध्ये साधारणत: ७०० ते ९०० इतक्या संख्येने दरवर्षी वाढ होते. पण, असे असताना काही श्रेणीतील गुन्ह्यांमध्ये घट होताना सुद्धा दिसून येते. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या जी २०२२ मध्ये ११६ वर गेली होती, ती २०२३ मध्ये ७९ वर आली आहे. (National Crime Records Bureau)

मुंबईच्या बाबतीत विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्कार झाले. २०२१ या लॉकडाऊनच्याच वर्षी ५२४ बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाले. २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली, तर २०२३ मध्ये ती कमी होऊन ५९० वर आली. (National Crime Records Bureau)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.