Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; कुकी आतंकवाद्यांनी भाजप नेत्याचे घर जाळले

118
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; कुकी आतंकवाद्यांनी भाजप नेत्याचे घर जाळले
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; कुकी आतंकवाद्यांनी भाजप नेत्याचे घर जाळले

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण दिसून आले. शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता चुरचंदपूरमधील तुइबोंग उपविभागातील पेनिअल गावात भाजपचे प्रवक्ते मायकेल लामजाथांग यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात हल्लेखोरांनी आग लावली. हल्ल्यादरम्यान घराच्या आवारात उभ्या असलेल्या एका कारलाही आग लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Manipur Violence)

(हेही वाचा – IMA Survey On Doctors Safety : ३५ टक्‍के महिला डॉक्‍टर रात्रपाळी करायला घाबरतात; इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्वेक्षण)

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

शनिवारी कुकी-जो समुदायाच्या लोकांनी आदिवासी बहुल भागात तीन रॅली काढल्या. आदिवासी बहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि तेंगनौपाल जिल्ह्यांतील अनुक्रमे लीशांग, कीथेलमनबी आणि मोरेह येथे करण्यात आले होते. चुराचंदपूरमधील निषेध रॅली लिशांगमधील अँग्लो कुकी वॉर गेटपासून सुरु झाली आणि सुमारे सहा किमीचा प्रवास संपवून तुईबाँग येथील शांती मैदानावर संपली. या रॅलींमध्ये कुकी-जो समुदायाने वेगळ्या प्रशासनाची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.

कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि झोमी स्टुडंट्स युनियनने पुकारलेल्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कांगपोकपीमध्ये शेकडो आंदोलकांनी कीथेलमन्बी मिलिटरी कॉलनीपासून सुरू झालेल्या रॅलीत भाग घेतला. ही रॅली आठ किमी अंतर कापल्यानंतर थॉमस मैदानावर संपली. स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीसाठी भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह शहरात निषेध मोर्चाही काढण्यात आला.

या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “शांतता रॅलीच्या नावाखाली आपल्या लोकांना लक्ष्य करणे, ही एक गंभीर त्रासदायक प्रवृत्ती आहे. अशा चिथावणीखोर कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देऊनही पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. बिरेन सिंह हे मैतई समाजाचे मुख्यमंत्री आहेत. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.