“… याबद्दल मविआ आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का?” उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा रोखठोक प्रश्न

133
डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी १२ हजार घरे; Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज जोडे मारो आंदोलन केले. मुंबई पोलिसांकडून परवानगीची वाट न पाहता आज (1 सप्टेंबर) महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मुंबईमधील हुतात्मा चौकात पोहोचले. दरम्यान, या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मविआसमोर प्रश्नांची सरबत्ती केली.

(हेही वाचा-Kolkata Rape Case: भाजपाचा TMC सरकारवर हल्लाबोल; आणखी चार घटना उघडकीस )

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही. पंडीत नेहरु, इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेली भाषणं आठवा. एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. पंडीत नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला. याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का?”

(हेही वाचा-Mumbai Police : ऐन गणेशोत्सवादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई पोलीस दलात चिंतेचे वातावरण)

“मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? काँग्रेसने सातत्याने शिवरायांचा अपमान केला. आधी त्यांनी देशाची आणि जगभरात जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागितली पाहिजे.” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.