Supreme Court चे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया हॅण्डल आढळून आले आहे, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्ली सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या बनावट सोशल हॅण्डलद्वारे सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागण्यात आले. मला कोर्टातील कॉलेजियमच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जायचे आहे, कॅब बुक करण्यासाठी ५०० रुपये हवे आहेत, अशी पोस्ट Supreme Court चे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाने लिहिली आहे.
(हेही वाचा Muslim : वासनांध मुसलमान आरिफने केला हिंदू अल्पवयीन मुलीचा विनयभंग )
CJI चंद्रचूड यांच्या नावाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यावर त्याची दखल घेतली गेली. त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या सोशल मीडियाच्या हॅण्डलवर सरन्यायाधीशांचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्याने सरन्यायाधीशांच्या नावाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नमस्कार, मी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) सरन्यायाधीश आहे आणि एक महत्त्वाची कॉलेजियम मीटिंग आहे. मी कॅनॉट प्लेसमध्ये अडकलो आहे. तुम्ही मला कॅबसाठी 500 रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचल्यावर पैसे परत करीन.
ही पोस्ट खरीखुरी वाटावी म्हणून फसवणूक करणाऱ्याने ही पोस्ट आयपॅडवरून पाठवली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुरक्षा विभागाने केलेल्या तक्रारीची दखल घेत सायबर गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community