शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर महाराष्ट्रात दंगली झाल्या पाहिजे; Chandrakant Khaire यांचे वादग्रस्त विधान

342

जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा इतर कोणत्याही महापुरुषाचा पुतळा असेल, त्या पुतळ्याची कोणी तोडफोड केली तर दंगली होतात. अख्खी गावे पेटवली जातात. सिंधुदुर्गमध्ये तर भला मोठा पुतळा कोसळला आहे आणि या सरकारविरोधात कोणी काहीच बोलत नाही. आम्ही देखील सरकारविरोधात बोलू नये असे वाटते का? उलट हे सरकार पदच्युत झाले पाहिजे. त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाली.

(हेही वाचा 10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

दंगली व्हायला पाहिजेत

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) खासगी वृत्तवाहिनीशी बोलत असताना म्हणाले, कुठल्याही गावात एखाद्या महापुरुषाचा पुतळा असेल आणि त्या पुतळ्याला कोणी धक्का लावला तर तिथे मोठ्या दंगली होतात. आज इतका मोठा प्रकार घडला आहे आणि मला एक कळत नाही की या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? त्या झाल्या पाहिजेत. आज महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी म्हणून आंदोलन करत आहोत. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करत आहोत. आम्हाला रोखले तरी आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार. कितीही पोलीस आले तरी आम्ही मागे हटणार नाही. कारण आम्हाला या गोष्टींची सवय झाली आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून राजकारणात, समाजकारणात सक्रिय आहोत. आता आम्ही मागे हटणार नाही, असे खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.