UPSC Exam 2022 च्या निकालासंदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या अकादमीला ५ लाखांचा दंड

117

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 (UPSC Exam 2022) संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) शंकर आयएएस अकादमी विरोधात कारवाईचा आदेश जारी केला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त म्हणू अनुपम मिश्रा जबाबदारी सांभाळत आहेत.

दिशाभूल करणारी जाहिरात केल्या प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आयएएस अकादमीला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एक महत्वाचा घटक या नात्याने ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच कोणत्याही वस्तू अथवा सेवांबद्दल,  कोणत्याही प्रकारची खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 तरतुदींचे उल्लंघन करण्याच्या वृत्तीला आळा बसावा या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 18 मधील तरतुदींनुसार, कोणत्याही वस्तू किंवा सेवांच्या संदर्भात कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून, या कायद्यातील तरतुदींचे किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियम तसेच नियामक तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची खातरजमा करण्याचे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण केंद्राकडे आहेत.

(हेही वाचा जीवनसंघर्ष करण्यासाठी तुमच्यामध्ये सामर्थ्य आणि विद्वतेची जोपासना करा; Vice President Jagdeep Dhankhar यांची सूचना)

शंकर आयएएस अकादमीने दिलेल्या जाहिरातीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 (UPSC Exam 2022) संदर्भात खाली नमूद दावे केले आहेत-

  • अखिल भारतीय स्तरावर 933 पैकी 336 जणांची निवड होणार
  • सर्वोत्कृष्ट 100 उमेदवारांमध्ये 40 उमेदवार
  • तामिळनाडूमधून 42 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, त्यापैकी 37 जणांनी शंकर आयएएस अकादमीमधून शिकवणी घेतली आहे.
  • भारतातील सर्वोत्कृष्ट आयएएस अकादमी

शंकर आयएएस अकादमीने विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची जाहिरात केली होती. मात्र वर नमूद केलेल्या जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात, यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आली होती असे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला या जाहिरातींच्या परिक्षणांमध्ये आढळून आले. ही माहिती लपवल्याने, जाहिरात पाहण्याऱ्यांपर्यत असा संदेश पोहचला की संस्थेने जे उमेदवार यशस्वी झाले आहे असा दावा केला आहे, त्या सगळ्यांनी या संस्थेने त्यांच्या संकेतस्थळा वर ज्या सशुल्क अभ्यासक्रमांची जाहिरात केली आहे, तेच अभ्यासक्रम निवडले होते. दुसऱ्या शब्दांत म्हणायचे तर या जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन ते संस्थेने जाहिरात केलेले सशुल्क अभ्यासक्रम खरेदी करण्याकडे आकृष्ट होतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.