रेल्वेमंत्र्यांनी दाखवले Vande Bharat Sleeper ट्रेनचे मॉडेल; विमानासारखी सुविधा, तिकीट राजधानीइतके…

221
रेल्वेमंत्र्यांनी दाखवले Vande Bharat Sleeper ट्रेनचे मॉडेल; विमानासारखी सुविधा, तिकीट राजधानीइतके...
रेल्वेमंत्र्यांनी दाखवले Vande Bharat Sleeper ट्रेनचे मॉडेल; विमानासारखी सुविधा, तिकीट राजधानीइतके...

वंदे भारत स्लीपर रेल्वेची (Vande Bharat Sleeper) पहिली जोडी रविवारी तयार झाली. पुढील १० दिवसांत ही गाडी चाचणीसाठी रवाना करण्यात येणार आहे. २ महिन्यानंतर ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. वंदे भारत रेल्वेत सध्या केवळ चेअर कार आणि वंदे भारत मेट्रो रेल्वे आहेत. या गाड्या एसी क्लासच्या आहेत. एसीशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अमृत भारत रेल्वे गाडी असेल.

(हेही वाचा-Rajkot Fort : महाराजांवरुन राजकारण नको, महाराजांसारखं राजकारण हवं!)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले, “या गाडीचे भाडे राजधानी गाडीइतकेच असेल. सुरुवातीला ८०० ते १२०० किमीपर्यंत ती धावेल. रात्रीच्या प्रवासासाठी ही रेल्वे प्रवाशांची पहिली पसंती असावी असा यामागे उद्देश आहे. या गाडीत उत्तम सीट, प्रवासावेळी अत्यंत कमी कंपने जाणवतील.” अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) च्या कारखान्यात ट्रेनची पाहणी केली. (Vande Bharat Sleeper)

(हेही वाचा-Union Minister Raksha Khadse यांनी महिलांच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी धरला आग्रह)

वंदे भारत आणि अमृत रेल्वेंच्या गाड्या हीच भारतीय रेल्वेची ओळख बनतील असे रेल्वे बोर्डाचे अधिकारी म्हणतात. राजधानी, शताब्दी रेल्वेगाड्यांनी खूप मोठे योगदान दिले. आता वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांवर ही जबाबदारी असेल. तंत्रज्ञानामुळे आता इंजिन व गाडीला वेगवेगळे लावण्याची गरज भासणार नाही. असंही त्यांनी सांगितले. (Vande Bharat Sleeper)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.