-
ऋजुता लुकतुके
अन्नपदार्थ हॉटेलमधून थेट आपल्या घरी आणून देणारी झोमॅटो कंपनी गेल्यावर्षभरात शेअर बाजारात मालामाल झाली आहे. आणि त्याचा थेट परिणाम कंपनीचं मूल्यांकन आणि भाग भांडवल वाढण्यात झालं आहे. कंपनीचे संस्थापक आणि मालक दिपेंदर गोयल ४१ व्या वर्षी तरुण अब्जाधीश बनले आहेत. तर कंपनीचं शेअर बाजारातील भागभांडवल २.१८ ट्रिलियन रुपयांवर पोहोचलं आहे. दिपेंदर यांच्याकडे कंपनीचे ४.२४ टक्के शेअर आहेत. त्याचं एकूण मूल्य ३६.९५ कोटी रुपये इतकं आहे. (Zomato Net Worth)
(हेही वाचा- Facebook Logo : तुमच्याही फेसबूकचा फेसबूक लोगो बदलला? मेटाने सांगितलं…)
भाग भांडवल आणि मूल्यांकनाच्या बाबतीत झोमॅटो ही जगातील ७७० वी मोठी कंपनी आहे. दिपेंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी २००८ मध्ये झोमॅटो कंपनीची स्थापना केली होती. सुरुवातीला कंपनीचं नाव फूडीबे असं होतं. या वेबसाईटवर भारतातील प्रमुख शहरांमधील हॉटेल्स आणि त्यांचे मेन्यू शोधण्याची सोय होती. शिवाय तुम्ही शहराचं किंवा गावाचं नाव साईटवर टाकलंत तर तुम्हाला तिथली चांगली हॉटेल आणि जेवणाचा मेन्यू सुचवण्याचं काम ही वेबसाईट करायची. २०१० मध्ये झोमॅटो या नावाने ही सेवा पुन्हा लाँच करण्यात आली. मोबाईल स्मार्ट झाले तेव्हा झोमॅटोच्या ॲपने ही सेवा सर्वांपर्यंत नेली. (Zomato Net Worth)
सुरुवातीला मनोरंजनात्मक कार्यक्रम, सिनेमा, नाटकं यांची तिकिटं झोमॅटोवर उपलब्ध होत होती. २०१५ पासून देशभरात हॉटेल ॲग्रीगेटर म्हणून त्यांनी ॲप लाँच केलं. त्याला अल्पावधीतच प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या काळात तर झोमॅटोच्या मागणीने आणखी जोर धरला. (Zomato Net Worth)
(हेही वाचा- Paris Paralympic Games : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला पदक विजेत्यांशी संवाद)
सध्या १,००० पेक्षा जास्त शहरं आणि गावांमध्ये झोमॅटोची सेवा सुरू आहे. कोव्हिडच्या उद्रेकानंतर २०२० पासून झोमॅटोने ऑनलाईन किराणा माल पुरवण्याची सेवाही सुरू केली आहे. (Zomato Net Worth)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community