मेटा समूहाच्या फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोगो (Facebook Logo) शनिवारी अचानक बदलला गेला होता. काळ्या बॅकग्राऊंडवर पूर्वीचा निळ्या एफ आकाराचा लोगो फेसबूक अॅपवर दिसत होता. त्यामुळे फेसबूकने लोगो बदलला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. दरम्यान, याप्रकरणी फेसबूकने आता स्पष्टीकरण दिलं आहे. बिझनेस इनसाइडरच्या एका अहवालानुसार मेटाने सांगितलं की ही एक तांत्रिक चूक होती.
(हेही वाचा-Yavatmal Hindus : हिंदूंनी बहिष्काराची धमकी देताच मुसलमान नरमले; यवतमाळ येथील घटना)
या समस्येचे आता निराकारण करण्यात आले आहे. वापरकर्त्यांनी त्यांचा ॲप अपडेट केला तर त्यांना मूळ लोगो दिसू शकणार आहे. फेसबूकचा लोगो बदलल्यानंतर फेसबूक, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस पडला. फेसबूकने लोगो बदलला का? या प्रश्नासह फेसबूककडून रिब्रॅन्डिग केली जात असल्याचंही म्हटलं गेलं. प्रत्येक वापरकर्त्याला हा बदलेला लोगो दिसला नाही. ही तांत्रिक चूक आता सुधारण्यात आली असून वापरकर्त्यांनी ॲप अपडेट केल्यानंतर त्यांना फेसबूकचा मूळ लोगो दिसू शकणार आहे. (Facebook Logo)
Did Facebook temporarily change its icon to dark mode or was it a bug ?
After updating it returned to normal !
I don’t have iOS 18, still on 17.1 stock, how did that happen ?#Facebook#iOS pic.twitter.com/ePoVkyQzJN
— AyMeN (@AyM3n_KcM) August 30, 2024
(हेही वाचा-Pune News: महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंचे फोटो आता भर चौकात होर्डिंगवर!)
मेटा समूहाच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲप्स आणिव्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपवर सातत्याने बदल होत असतात. तर कधीकधी प्रायोगिक तत्त्वावरही बदल केले जातात. त्यामुळे यावेळीही मेटाकडून असंच काहीतरी झालं असण्याची शक्यता होती. पंरतु, त्यांनी ही तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं. (Facebook Logo)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community