योग संस्कृतीला निधर्मीयतेचा मुलामा देण्याचा अभिषेक मनू सिंघवींचा घृणास्पद प्रयत्न! 

'२१ जून' रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी राजकरण केले. 

194

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत ‘२१ जून’ हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो पारित झाला. त्याप्रमाणे २०१५ सालापासून हा दिवस जागतिक पातळीवर साजरा होऊ लागला. आज सलग सात वर्षे पंतप्रधान नरेंद मोदींच्या प्रयत्नाने अवघ्या विश्वाने भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या योगाला स्वीकारले आहे. हे काँग्रेसच्या अजून पचनी पडलेले दिसत नाही. म्हणून योगाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी मुद्दाम निधर्मीयतेचा मुलामा देण्याचा घृणास्पद प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान! )

अभिषेक मनू सिंघवी यांनी काय म्हटले?

अभिषेक सिंघवी यांनी ट्विट करत ‘ऊँ’ चे उच्चारण केल्याने ना योग शक्तीशाली होत ना अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत’ असे म्हटले. त्यावर ट्विटरवर नेटकऱ्यांनी संघवी यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावर तिळपापड झालेले सिंघवी यांनी यामध्ये श्रीराम मंदिर निर्माणच्या विषयात हात घातला. त्यावर बोलताना अभिषेक सिंघवी यांनी, ‘श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भक्तांकडून जमा केलेला निधी लुटणारे लोक माझ्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करत स्वतःची तहान भागवत आहेत. समजून घ्या कि, योग सनातन काळापासून भारताच्या कणाकणात आहे. योग विद्या असो वा माझी आस्था यावर कुणा धूर्त राष्ट्रवादीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. अपप्रचारापासून वाचा!, अशा प्रकारे सिंघवी यांना विरोध होताच त्यांनी मोठ्या शिताफीने शब्दच्छल केला. यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राहिलेली कसूर भरून काढत त्यांनी ट्विट केले कि, हा योग्य दिवस आहे, योग दिवसाच्या निमित्ताने लपण्याचा दिवस नाही., असे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.