Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?

140
Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?
Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) होत आहे का? असा प्रश्न राज्यातील जनतेकडून विचारला जात आहे. (Shiv Sena UBT)

दंगली झाल्या पाहिजे

याचे कारण म्हणजे, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उपस्थित केलेला प्रश्न. ते म्हणाले, “कुठल्याही गावात शिवाजी महाराज किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काही विघ्नसंतोषी लोकांनी काही केले तर मोठ्या दंगली होतात. मला समाजात नाही आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतरही महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? हे बरोबर नाही, झाल्या पाहिजेत,” असे मत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प)

यावरून सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच उबाठाच्या आडून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवून अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (Shiv Sena UBT)

महाराष्ट्रातील जनता सुज्ञ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “खरं तर लोकसभा निवाडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे काही नेते दंगलीची भाषा करत होते आणि जाती-जातीत तेढ निर्माण व्हावी, असाही प्रयत्नही केला. त्यांना महाराष्ट्र अशांत हवा आहे. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, संयमी आहे. आणि महाराष्ट्र सरकारदेखील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते आहे.” (Shiv Sena UBT)

(हेही वाचा- Nitesh rane: नितेश राणेंवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?)

खैरे यांची सुप्त इच्छा 

भाजपाने खैरे यांच्यावर टीका करत दंगली व्हाव्या ही खैरे यांची सुप्त इच्छा आहे, असा आरोप केला. “खैरे यांनी त्यांच्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवल्याचे दिसते आहे. दंगली का घडत नाही असा प्रश्न मनात येणे आणि उद्वेगाने विचारणे यामागचा त्यांचा हेतू काय, तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट करावा, असे मत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडले. (Shiv Sena UBT)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.