Suryakumar Yadav : सूर्यकुमारची बोटाची दुखापत किती गंभीर? दुलिप करंडकाला मुकणार?

Suryakumar Yadav : बूचीबाबू करंडकात दुसऱ्या डावात सूर्यकुमार फलंदाजीला आला नाही 

102
Suryakumar Yadav : सूर्यकुमारची बोटाची दुखापत किती गंभीर? दुलिप करंडकाला मुकणार?
Suryakumar Yadav : सूर्यकुमारची बोटाची दुखापत किती गंभीर? दुलिप करंडकाला मुकणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुलिप करंडक खेळण्याची शक्यता कमीच आहे. बूचीबाबू करंडकात (Buchi Babu Tournament) तामिळनाडू विरुद्ध खेळताना सूर्यकुमारच्या हाताचं बोट दुखावलंय. सूत्रांच्या माहितीवरून तो बंगळुरूमध्ये क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. त्यावरून ही दुखापत थोडीशी गंभीर असण्याचीच शक्यता आहे. ३३ वर्षीय सूर्यकुमार बूचीबाबू करंडकात तामिळनाडू संघाविरुद्ध लेग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू त्याच्या हातावर जोरात बसला.

(हेही वाचा- Mumbai Local Train : दर रविवारी मेगाब्लॉक घेवूनही सलग दुसऱ्या आठवड्यात हार्बर लाईन ठप्प)

त्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. पुढचे दोन दिवस त्याने क्षेत्ररक्षणही केलं नाही. तर मुंबईच्या संघाला विजयासाठी ५०० हून अधिक धावा हव्या असताना दुसऱ्या डावात तो फलंदाजीलाही उतरला नाही. दुलिप करंडकात खेळता यावं यासाठी सावधानता म्हणून त्याने फलंदाजी केली नाही, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण, तो बंगळुरूला पोहोचल्यामुळे आता दुखापत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. (Suryakumar Yadav)

दुलिप कंरडक ही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची कसोटी स्पर्धा आहे. भारतीय राष्ट्रीय संघाचा दरवाजा या स्पर्धेतूनच खुला होतो. कारण, निवडक ४ संघ ही स्पर्धा खेळतात. आणि या संघांमध्ये निवड होणं म्हणजे निवड समितीच्या सदस्यांसमोर खेळ सादर करण्याची संधी मिळणं, असाच होतो. शिवाय यंदा या स्पर्धेंनं देशांतर्गत हंगाम सुरू होत आहे. आणि नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात असल्यामुळे त्यापूर्वीची तयारी आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी म्हणून ही स्पर्धा महत्त्वाची आहे. (Suryakumar Yadav)

(हेही वाचा- Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?)

सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा मुख्य खेळाडू आहे. पण, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटीत त्याच्या नावाचा फारसा विचार होत नाही. आधीचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी तर सुर्यकुमारला नेहमी टी-२० तज्ज म्हणूनच पाहिलं. त्यामुळे दुलिप करंडकात खेळण्याची संधी ही सुर्युकमारसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (Suryakumar Yadav)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.