bharat gaurav train च्या तिकिटाचे दर आहेत तरी किती?

118
bharat gaurav train च्या तिकिटाचे दर आहेत तरी किती?

IRCTC ने तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी परवडणाऱ्या दरात प्रवास देण्यासाठी अनेक टूर पॅकेज आणते आहेत. IRCTC ने अयोध्येतील राम मंदिर ते प्रयागराज आणि इतर तीन ज्योतिर्लिंगांच्या प्रवासासाठी गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन म्हणजेच भारत गौरव ट्रेन (bharat gaurav train) सुरू केली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी भारत गौरव ट्रेनचीही दोन प्रकारात रचना करण्यात आली आहे. त्यापैकी एका ट्रेनमध्ये स्लीपर क्लास म्हणजेच नॉन-एसी, थर्ड एसी आणि सेकंड एसी कोच आहेत. ज्यामध्ये ६०० ते ७०० लोक आरामात बसू शकतात. तर दुसरी ट्रेन फुल एसी आहे, ज्यामध्ये खास रेस्टॉरंट्स, लेग मालिशपासून अत्याधुनिक सुविधा आहेत. या ट्रेनमध्ये जवळपास २६८ आसनांची जागा आहेत.

(हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमारची बोटाची दुखापत किती गंभीर? दुलिप करंडकाला मुकणार?)

प्रवासादरम्यान भारत गौरव ट्रेनमध्ये (bharat gaurav train) प्रवाशांना अनेक वर्गवार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्यामध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम, सकाळ, दुपार आणि रात्री शाकाहारी भोजन, सकाळ-संध्याकाळ चहा-नाश्ता, वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसेसची व्यवस्था असेल. याशिवाय कोचमध्ये सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आणि टूर एस्कॉर्ट्स उपलब्ध असतील.

धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे विशेष टूर पॅकेज ५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाले आहे. गुजरातमधील राजकोट येथून सुरेंद्रनगर, विरमगाम, आनंद, छायापुरी, नडियाद, दाहोद, गोध्रा, रतलाम आणि मेघनगर येथून प्रवाशांना बोर्डिंगची सुविधा मिळेल. प्रवाशांच्या मदतीसाठी, IRCTC अधिकारी राकेश कुमार यांच्याशी ९५३४८-७१३९६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल. इच्छुक पर्यटक IRCTC, बिस्कोमेन टॉवर (चौथा मजला), पश्चिम गांधी मैदान, पटणा-१ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ९७७१४४००५६, ८५९५९३७७२७ येथे तपशीलवार माहिती मिळवू शकतात आणि बुकिंग करु शकतात.

(हेही वाचा – british residency lucknow : ब्रिटिश रेसिडेन्सीबद्दल काही महत्त्वाची तथ्ये जाणून घ्या!)

स्लीपर क्लासने प्रवास करण्याचे शुल्क प्रती व्यक्ती २०,०६० रुपये असेल. तर स्टँडर्ड क्लासमध्ये हा प्रवास थर्ड एसी क्लासमधून होईल. त्याचे शुल्क प्रती व्यक्ती ३१,८०० रुपये आहे. याशिवाय कम्फर्ट वर्गात २रा एसी क्लासमध्ये प्रवास होईल. त्याचे शुल्क ४१,६०० रुपये प्रती व्यक्ती आहे. (bharat gaurav train)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.