जसे चित्रपटसृष्टीत संधी देण्यासाठी नव्या महिला कलाकारांचे लैंगिक शोषण करून संधी दिली जाते. तशीच परिस्थती सध्या काँग्रेस पक्षात सुरु आहे. या पक्षात नव्या महिला नेत्यांना संधी देण्यासाठी कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागते, असा गंभीर आरोप काँग्रेसच्याच (Congress) महिला नेत्याने केला आहे. त्यावर पक्षाने त्या महिला नेत्याची बाजू समजून घेण्याऐवजी त्या महिला नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी केली आहे.
ज्या महिलांना प्रतिष्ठा आणि स्वाभिमान आहे, त्या काँग्रेसमध्ये (Congress) काम करू शकत नाहीत. पक्षासाठी लढणाऱ्या व्यक्तीची त्यांनी हकालपट्टी केली आहे. पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय ट्रॅक रेकॉर्ड पाहावे, जवळच्या असलेल्या, काँप्रोमाईज करणाऱ्या नेत्यांना संधी दिली जात आहे. केएसयू आणि महिला काँग्रेसमध्ये तळागाळात केलेल्या कामाच्या आधारे ही पदे देण्यात आलेली नाहीत.
– सिमी रोज बेल जॉन, काँग्रेसच्या पक्षातून हकालपट्टी केलेल्या नेत्या
(हेही वाचा Shiv Sena UBT च्या माध्यमातून महाविकास आघाडीचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न?)
काय आहे प्रकरण?
केरळमधील काँग्रेस (Congress) पक्षाच्या नेत्या सिमी रोज बेल जॉन यांनी पक्षातील नेत्यांवर कास्टिंग काऊचचे गंभीर आरोप केले आहेत. काँप्रोमाईडज केलेल्यांनाच पक्षात संधी दिली जात असल्याचा आरोप ज़ॉन यांनी केला आहे. या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सिमी ज़ॉन यांच्याविरोधात कारवाई करताना काँग्रेसने (Congress) निवेदन जारी केले आहे. यामध्ये केपीसीसी राजकीय व्यवहार समितीच्या महिला नेत्या, केपीसीसी पदाधिकारी आणि महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संयुक्तपणे केपीसीसी नेतृत्वाला सिमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सिमी यांनी शिस्तीचा गंभीर भंग केला असल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत असल्याचे यात म्हटले आहे. काँग्रेसशी संबंधित शेकडो महिलांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे कारण यात दिले आहे.
Join Our WhatsApp Community