कॉँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वारंवार जातीनिहाय जनगणनेची मागणी करून जातीचे राजकारण करत आहेत. त्यावर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भूमिका मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) सोमवारी, २ सप्टेंबर रोजी जातनिहाय जनगणनेबाबत म्हटले की, हे लोकांच्या हितासाठी योग्य आहे, परंतु निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याचा वापर करू नये.
केरळमधील पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 3 दिवसीय समन्वय बैठकीनंतर मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात ते म्हणाले की, सरकारने केवळ आकडेवारीसाठी जात जनगणना करावी. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती आणि प्रत्येकजण त्याबद्दल चिंतेत आहे. देशात अशाच प्रकारच्या घटना वाढत आहेत. या बैठकीत सरकारची भूमिका, अधिकृत यंत्रणा, कायदे, दंडात्मक कारवाई आणि कार्यपद्धती यावर चर्चा झाली. या सर्व प्रकरणांचा फेरविचार व्हायला हवा, जेणेकरून योग्य प्रक्रिया, जलद प्रक्रियेचा अवलंब करून पीडितेला न्याय मिळवून देता येईल, असे प्रत्येकाचे मत आहे.
(हेही वाचा लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवली; Ajit Pawar यांची स्पष्टोक्ती)
उत्तराखंडमध्ये UCC लागू होण्यापूर्वी त्यांनी ते सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवले होते. त्यामुळे मला वाटते की त्यांना 2 लाखांहून अधिक अर्ज आले आणि त्यांनी त्यावर चर्चा केली. मला वाटते की ते आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. जनतेला याचा अनुभव आहे, मग आपण त्यावर चर्चा करू शकतो. (RSS)
Join Our WhatsApp Community